Monday, June 21, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी मिझोराममधील विद्यार्थी नेटवर्कच्या शोधात चढतात टेकड्या

ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी मिझोराममधील विद्यार्थी नेटवर्कच्या शोधात चढतात टेकड्या

१ हजार ७०० लोकसंख्या असलेल्या गावात केवळ 2G इंटरनेट कनेक्टिव्हिटी

Related Story

- Advertisement -

देशात लॉकडाऊनमुळे ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी शहरी भागात पुरेसे इंटरनेट कनेक्शन उपलब्ध आहे. मात्र देशातील अनेक दुर्गम भागात आजही इंटरनेट कनेक्शन नाही. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण होण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. ऑनलाईन शिक्षणासाठी मिझोराममधील काही विद्यार्थी चक्क टेकड्या चढून इंटरनेट कनेक्शन शोधून तिथे त्यांचा अभ्यास पूर्ण करुन परीक्षा देत आहेत. मिझोराममधील एका दुर्गम खेड्यातील कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास ऑनलाईन सुरु आहे. मात्र गावात इंटरनेट कनेक्सिव्हिटी नसल्यामुळे मुलांच्या शिक्षणात अडथळा येतो. ऐझावळ गावापासून सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या साहरा जिल्ह्यांतील दुर्गम गावात इंटरनेट कनेक्टिविटीच्या अभावामुळे इथले सात विद्यार्थी क्लाऊड ट्ला टेकड्या चढून तिथे इंटरनेट कनेक्टिवीत परीक्षा देतात. (Students in Mizoram climb hills in search of a network to take online exams)

या सात विद्यार्थांनी टेकड्यावर इंटरनेट कनेक्शन शोधले आहे. त्याच ठिकाणी त्यांनी खराब वातावरणापासून संरक्षण मिळवण्यासाठी केळीच्या पानांची तात्पुरती झोपडी तयार केली आहे. या झोपडीत बसून ते त्यांच्या अभ्यास करतात. मिझोराम राज्यातील साईहा जिल्ह्यातील एक दुर्गम गाव आहे. हे गाव संपूर्णपणे टेकड्यांनी वेढलेले आहे. त्यामुळे या गावात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही. गावात केवळ २ जी इंटरनेट कनेक्टिवीटी आहे.

- Advertisement -

मिझोराममधील सात विद्यार्थ्यांनी सांगितले की, आमच्या गावात इंटरनेट कनेक्शन नाही. टेकड्यांवर गेल्यानंतर आम्हाला नेटवर्क मिळते. १ हजार ७०० लोकसंख्या असलेल्या गावात केवळ 2G इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे. चांगल्या इंटरेनट कनेक्सनसाठी आम्हाला टेकड्या चढून वर यावे लागते.


हेही वाचा – Vaccine: खासगी रुग्णालयात लसींच्या किंमती निश्चित, Covaxin असणार सर्वात महाग

- Advertisement -