घरमुंबईVideo: वांद्रे टर्मिनसवर परप्रांतिय मजुरांची गर्दी; आपल्या गावी जाण्यास धडपड सुरू

Video: वांद्रे टर्मिनसवर परप्रांतिय मजुरांची गर्दी; आपल्या गावी जाण्यास धडपड सुरू

Subscribe

पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी मजुरांना समजवून घरी पाठवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एकीकडे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन केले जात असताना उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये सोमवारी सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडाल्याचे बघायला मिळाले होते. त्यानंतर मंगळवारी मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर पुन्हा एकदा परप्रांतिय मजुरांनी तुफान गर्दी केल्याचे समोर आले आहे.

मंगळवारी सकाळी नऊ वाजता मजूर वांद्रे स्टेशन परिसरात जमले होते. यावेळीही सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला असला तरी या मजुरांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. १४ एप्रिल रोजी पहिला लॉकडाऊन संपल्यानंतर वांद्रे स्थानकाबाहेर अचानक अशीच तुफान मजुरांची गर्दी झाली होती आणि आज पुन्हा तसाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारला जाणाऱ्या या श्रमिक स्पेशल ट्रेनमधून जाण्यासाठी हे मजूर वांद्रे टर्मिनसवर आले होते. त्यापैकी नोंदणी केलेल्या साधारण १००० मजुरांना ट्रेनमध्ये प्रवेश देण्यात आला आहे.

- Advertisement -

या घडलेल्या प्रकाराबद्दल पश्चिम रेल्वेने ट्वीटद्वारे माहिती दिली आहे, ‘१९ मे २०२० रोजी राज्य सरकारकडून नोंदणी केलेल्या प्रवाशांसाठी वांद्रे टर्मिनस ते पूर्णिया श्रमिक स्पेशल ट्रेन सोडण्यात आली. त्यासाठी नोंदणी न केलेल्या अनेक मजूरांनी पूल आणि रस्त्यावर गर्दी केली होती. नोंदणीकृत मजुरांना घेऊन ही ट्रेन रवाना झाली मात्र उर्वरित गर्दी पोलिसांनी कमी केली.’

दरम्यान पश्चिम रेल्वेच्या दुसऱ्या ट्विटमध्ये असे सांगण्यात आले की, ‘सध्या स्टेशनवरील सर्व तिकीट काऊंटर बंद असल्याने कोणतेही तिकीट मिळत नाही. श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये राज्य सरकारकडे नोंदणी केलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी दिली जाते. त्यामुळे लोकांनी कोणत्याही कारणाशिवाय स्टेशनवर गर्दी करु नये,’ असे आवाहनही पश्चिम रेल्वेने पुढच्या ट्वीटमध्ये केले आहे.


गाझियाबादमध्ये श्रमिक ट्रेनसाठी मजुरांनी केली तुफान गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -