घरमुंबईपत्नीला बेशुद्ध करुन करायचा घाणेरडं कृत्य; पत्नीने विरोध केल्यावर दिला घटस्फोट

पत्नीला बेशुद्ध करुन करायचा घाणेरडं कृत्य; पत्नीने विरोध केल्यावर दिला घटस्फोट

Subscribe

पती-पत्नीचे नाते खूपच संवेदनशील असते. संसाराचा गाढा ओढताना दोघेही एकमेकांची काळजी घेतात. मात्र, बर्‍याच प्रकरणांमध्ये विरोधाभासदेखील दिसून आला आहे. या अशा प्रकरणांमुळे या नात्यातील विश्वासाच्या भिंतीला तडा जातो. असंच एक प्रकरण मुंबईमधून समोर आलं आहे. ४६ वर्षीय पती स्वत:च्या पत्नीला बेशुद्ध करुन अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवायचा. पत्नीने विरोध केला म्हणून या व्यक्तीने तिला घटस्फोट दिला. मुंबईतील ४६ वर्षीय व्यक्तीला पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याप्रकरणी तसंच पत्नीला तीन तलाक दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

पतीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित पत्नीने केला आहे. तक्रारीत पीडितेने म्हटलं आहे की तिचे २०१८ रोजी आरोपीशी लग्न झालं होतं आणि यापूर्वीही त्याने दोनदा लग्न केल्याचा आरोप आहे. त्याने आपल्या दोन्ही पत्नींना घटस्फोट दिला होता. लग्नानंतर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. दमदाटी करुन लैंगिक अत्याचार करायचा. विरोध केला तर त्याकडे दुर्लक्ष करायचा.

- Advertisement -

आरोपी अनेकदा अश्लील व्हिडीओ दाखवायचा

पीडितेचे म्हणणे आहे की तो बर्‍याचदा तिला अश्लील व्हिडीओ दाखवत असे आणि तिलाही असे करण्यास भाग पाडत असे. लग्नानंतर तिला तो ज्यूस प्यायला द्यायचा. ते प्यायल्या नंतर मी बेशुद्ध व्हायची. त्यानंतर तो अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करायचा.

खासगी भागात Aluminum ची रॉड घातली

एकदा त्याने अमानुषतेची मर्यादा ओलांडली आणि माझ्या खासगी भागात अॅल्युमिनियमची रॉड घातली, ज्यामुळे रक्तस्त्राव होऊ लागला. मला उपचारांसाठी डॉक्टरांकडे जावे लागले. त्यानंतर तो असंच काहीसं पुढे करत राहीला, असं पीडित पत्नीने सांगितलं.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -