Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी पगारासाठी पैसे नसल्याने हयात रिजेंसी मुंबई पुढील सूचना मिळेपर्यंत बंद

पगारासाठी पैसे नसल्याने हयात रिजेंसी मुंबई पुढील सूचना मिळेपर्यंत बंद

हयात रिजेंसी मुंबईचे मालक एशियन हॉटेल्स लिमिटेडकडून कर्मचाऱ्यांच्या पगाराची कोणतीही रक्कम देण्यात आलेली नाही.

Related Story

- Advertisement -

मुंबईतील सर्वात प्रसिद्ध असलेले पंचतारांकित हॉटेल हयात रिजेंसी पुढील सूचना येईपर्यंत अनिश्चित काळासाठी बंद असणार आहे. (Hyatt Regency Mumbai closed until further notice, No Funds For Salaries ) अनेक आर्थिक गोष्टींचा सामना करावा लागत असल्याचे मालमत्तेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पगाराचे पैसे देखील नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे हयात रिजेंसी अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहे. आज प्रसिद्ध झालेल्या एका निवेदनात हॉटेलचे महाव्यवस्थापक हरदीप मारवाह यांनी असे म्हटले आहे की, हयात रिजेंसी मुंबईचे मालक एशियन हॉटेल्स लिमिटेडकडून कर्मचाऱ्यांच्या पगाराची कोणतीही रक्कम देण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे हॉटेलचा संपूर्ण कारभार चालवण्यासाठी देखील कोणत्याही प्रकारचा पाठिंबा देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी देण्यात येत नाही. याविषयी सर्व माहिती आम्ही आमच्या सर्व ऑन रोल कर्मचाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे सर्व कामे तात्काळ स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील सूचना येईपर्यंत हयात रिजेंसी मुंबई बंदच राहिल,असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

देशात कोरोना महामारिचा सर्वाधिक फटका देशभरातील हॉटेल इडस्ट्रीला बसला आहे. पर्यटन मंदी आणि व्यापार मंदीमुळे प्रवास कमी झाला आहे. गेल्या वर्षी कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर उद्योग धंद्यांना मोठा फटका बसल्यानंतर पर्यटक पुन्हा येऊ लागले असतानाच कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा एकदा उद्योगधंदे ठप्प झाले आहेत.


हेही वाचा – आरेच्या ८१२ एकर जागेवर वन विभाग फुलवणार जंगल, वनसंपदेचे संवर्धन करण्याचा मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

- Advertisement -

 

 

- Advertisement -