घरमुंबईमी महिलेचा विनयभंग केला नाही - महापौर

मी महिलेचा विनयभंग केला नाही – महापौर

Subscribe

मी महिलेचा विनयभंग केलेला नाही. याशिवाय मी चुकीचे वागलेलो नाही. माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत, असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले.

‘मी कोणत्याही महिलेचा विनयभंग केलेला नाही. हे राजकारण केले जात असून राजकारणात अशाप्रकारचे आरोप केले जातात’, असे मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले आहेत. गेले तीन दिवस मुंबईत प्रचंड पाऊस पडला. पावसामुळे रविवारी दुपारी सांतक्रूज येथे एका ४५ वर्षाच्या महिलेचा घरात शॉक लागून मृत्यू झाला. यावेळी महिलेचा २६ वर्षीय मुलगा तिला वाचवण्यासाठी गेला तर त्याचाही मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण वातावरण शोकाकूळ होते. या दुर्घटनेनंतर स्थानिक नगरसेवक यांनी घटनास्थळी भेट दिली नाही म्हणून नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला. बुधवारी जेव्हा महापौर या ठिकाणी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले त्यावेळी स्थानिक महिला आणि नागरिकांनी त्यांचा रस्ता अडवला. यावेळी महापौरांनी एका महिलेचा हात पिळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याबाबत महापौरांना प्रश्न विचारला असता आपण कुठल्याही महिलेचा विनयभंग केला नसून काहीही चुकीचे केलेले नाही, असे महाडेश्वर म्हणाले.

‘मनसेच्या कार्यकर्त्यांनी आमचा रस्ता रोखला’

विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले की, ‘परवाच्या दिवशी प्रभाग क्रमांक ९४ जिथे प्रज्ञा भूतकर नगरसेवक आहेत त्या भागात नागप म्हणून ४६ वर्षीय महिलेचा शॉक लागून मृत्यू झाला. त्यांना वाचवायला गेलेल्या त्यांच्या २६ वर्षीय मुलाचाही मृत्यू झाला. त्यानंतर त्यांना महापालिकेच्या व्ही. एन. देसाई हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांना भेटलो. त्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. काल आम्ही तिथे दर्शनासाठी गेलो. तेव्हा तिथे दारु पिलेलेले काही कार्यकर्ते होते. ते म्हणाले की नगरसेविका आल्या नाहीत. खरंतर ती वेळ नव्हती राजकारण करण्याची. परंतु, तरीही मनसेच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला रोखले. स्थानिक नगरसेवक होते आणि मी होतो. मात्र, तिथे मनसेच्या दोन-चार महिलांनी हात पकडून रस्ता रोकण्याचा प्रयत्न केला. आमच्या कार्यकर्त्यांनी हात बाजूला केला आणि आम्ही निघून गेलो. कोणत्याही प्रकारचा विनयभंग केला नाही. कोणतीही चुकुची गोष्ट आम्ही केली नाही.’ राजकारणामध्ये जाणीवपूर्वक आरोप केले जात असल्याचेही महापौर म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – सांताक्रूझमध्ये विजेच्या शॉकने आई-मुलाचा मृत्यू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -