घरमुंबईआयसीआयसीआयच्या सीईओ चंदा कोचर यांचा राजीनामा स्वीकारला

आयसीआयसीआयच्या सीईओ चंदा कोचर यांचा राजीनामा स्वीकारला

Subscribe

आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी राजीनामा दिला असून त्यांच्या जागी संदीप बक्षी यांची सीईओपदी नेमणूक करण्यात आली आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी राजीनामा दिला असून त्यांच्या जागी संदीप बक्षी यांची सीईओपदी नेमणूक करण्यात आली आहे. या बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांनी चंदा कोचर यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यापूर्वी चंदा कोचर यांना व्हिडिओकॉन कर्जाच्या प्रकरणी रजेवर पाठवण्यात आले होते. तर त्यांच्या जागी संदीप बक्षी यांना मुख्य परिचालन अधिकारी (सीओओ) पदावर नियुक्त करण्यात आले होते. संदीप बक्षी आयसीआयसीआय Prudential Life Insurance चे सीईओ आणि एमडी असणार आहेत. बक्षी यांनी १९८६ साली आयसीआयसीआय लि. मधूनच आपल्या करिअरची सुरूवात केली होती. संदीप बक्षी यांच्या जागी एन. एस. कन्नन यांना आयसीआयसीआय Prudential Life Insurance चे सीईओ बनवण्यात आले आहे.

- Advertisement -

दीपक कोचर यांच्या कंपनीला कर्ज दिल्याचा आरोप 

व्हिडिओकॉन ग्रुपला कर्ज दिल्याप्रकरणी चंदा कोचर यांचे पती चौकशीच्या फेऱ्यात आले होते. त्यांचे पती दीपक कोचर यांची कंपनी न्यू पॉवरला आयसीआयसीआय बँकेने ३ हजार कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. दीपक कोचर हे या कंपनीचे अध्यक्ष आहेत. या कंपनीत व्हिडिओकॉन ग्रुपची ६४ कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. त्यामुळे या कंपनीला कर्ज दिल्याचा आरोप चंदा यांच्यावर लावण्यात आला होता.

काय आहे व्हिडीओकॉन कर्ज प्रकरण

वेणुगोपाल धूत यांच्या व्हिडीओकॉन ग्रुपला २० बँकांच्या ग्रुपने कर्ज दिले. ज्यामध्ये आयसीआयसीआय बँकेचा वाटा हा १० टक्के होता. आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर वेणुगोपाल धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दिपक यांच्या साथीने न्यू पॉवर रिन्यूएबल कंपनीची सुरूवात केली. ज्यामध्ये दिपक कोचर याची ५० टक्के भागीदारी होती. यानंतर शेअरहोल्डर अरविंद गुप्ता यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून भ्रष्टाचाराची तक्रार केली. तसेच वेणुगोपाल धूत आणि चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या नातेवाईकांनी मिळून डिसेंबर २००८ साली एका कंपनीची स्थापना केली. या कंपनीला आयसीआसीआय बँकेने ६४ कोटी रूपयांचे कर्ज दिले. त्यानंतर काही दिवसांमध्ये कंपनीची मालकी अवघ्या ९ लाख रूपयांना दिपक कोचर यांना मिळाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -