घरमुंबईCorona Vaccination : केंद्राच्या मान्यतेने आणखी २९ खासगी रुग्णालयांत लसीकरण

Corona Vaccination : केंद्राच्या मान्यतेने आणखी २९ खासगी रुग्णालयांत लसीकरण

Subscribe

मुंबईत कोरोनावरील लस अलिकडेच उपलब्ध झाली आहे.

केंद्र सरकारने मुंबईतील आणखी २९ खासगी रुग्णालयांना कोविड लसीकरणाला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता खासगी रुग्णालयात आणखीन जोमाने लसीकरण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भातील माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे. मुंबईत कोरोनावरील लस अलिकडेच उपलब्ध झाली आहे. पालिका रुग्णालयासह पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयात लस टोचण्यास सुरुवात झाली आहे.

ज्या खासगी रुग्णालयात २०० खाटांची क्षमता आहे, त्या विक्रोळी येथील श्रुशुश्रा रुग्णालय, के.जे. सोमय्या रिसर्च अँड सेंटर, नानावटी रुग्णालय,वोकाहार्ट रुग्णालय, हिंदूजा रुग्णालय, सैफी रुग्णालय, होली फॅमिली रुग्णालय, मसिना रुग्णालय एस. एल. रहेजा रुग्णालय, लिलावती रुग्णालय, गुरुनानक रुग्णालय, बाॅम्बे हाॅस्पीटल यांसारख्या २९ रुग्णालयात लसीकरणास केंद्र सरकारने मान्यता दिल्याचे आयुक्तांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -