घरमुंबईत्या प्रकरणी फेसबुकला ३४ हजार कोटींचा दंड

त्या प्रकरणी फेसबुकला ३४ हजार कोटींचा दंड

Subscribe

केंब्रिज अॅनालिटिका स्कँडल प्रकरण फेसबुकला भोवलं असून दंडात्मक कारवाईसह फेसबुकला यापुढे काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. 

प्रायव्हसी ब्रीच आणि केंब्रिज अॅनालिटिका स्कँडलच्या सेटलमेंटसाठी फेसबुकला ३४ हजार कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. फेडरल ट्रेड कमिशनने हा निर्णय दिला असून फेसबुकनेसुद्धा हा दंड भरण्यास तयार आहे. हा आजवरचा सर्वात मोठा दंड मानला जात आहे. यूजर्सशी खोटं बोलणं, प्रायव्हसीशी तडजोड करणं आणि सेक्युरिटीसाठी यूजर्सनी दिलेल्या नंबरवर जाहिरात देणे आदी आरोप फेडरल ट्रेड कमिशनकडून फेसबुकवर ठेवण्यात आले होते.

यावेळी फेशियल रिकॉग्निशनबाबतही फेसबुक यूजर्सशी खोटं बोलल्याचाही आरोप करण्यात आला. यावेळी फेशियल रिकॉग्निशन बाय डिफॉल्ट ऑफ नव्हतं, हा आरोपही फेसबुकवर ठेवण्यात आला आहे. फेसबुकला दंड ठोठावण्याबरोबरच कमिशनने फेसबुकला काही सूचनासुद्धा केल्या आहेत. त्यानुसार फेसबुकला प्रत्येक नव्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिससाठी प्रायव्हेसी रिव्ह्यू करणे, दर तीन महिन्याला सीईओ आणि त्रयस्थ पक्षकाराला या रिव्ह्यूचा एसेसर देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

केंब्रिज अॅनालिटिका या संस्थेने फेसबुकवरील यूजर्सचा डेटा चोरून या डेटाचा गैरवापर केल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला. याबाबत फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्ग याने जाहीर माफीसुद्धा मागितली होती. त्यानंतर काही हॅकर्सने फेसबुकच्या view as सेटिंगचा गैरवापर करत युजर्सची नावं, पत्ता अशी प्राथमिक माहितीसह इतर डेटा चोरला होता. १ कोटी चाळीस लाख फेसबुक यूजर्सची फेसबुक प्रोफाइलवरची गोपनीय माहितीही चोरीला गेली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -