यंदाच्या नवरात्रोत्सवात तीन दिवस उशिरापर्यंत रंगणार गरबा; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

रात्री 12 वाजेपर्यंत सूट दिली असल्याने सोमवार, मंगळवार आणि शनिवार या तीन दिवशी अनेकांना गरबा खेळण्याचा मनमुराद आनंद घेता येणार आहे.

नवरात्रोत्सवात केवळ शेवटचे दोन दिवस रात्री 12 पर्यंत गरबा खेळण्याची परवानगी दिली होती अशी दिली होती. मात्र आता सरकारने यात आणखी एका दिवसाची वाढ केली आहे. त्याचबरोबर आधी ही वेळ 10 पर्यंत होती. मात्र आता रात्री 12 वाजेपर्यंत सूट दिली असल्याने सोमवार, मंगळवार आणि शनिवार या तीन दिवशी अनेकांना गरबा खेळण्याचा मनमुराद आनंद घेता येणार आहे.

दरम्यान सरकारने जे निर्णय जारी केले होते त्यानुसार, पर्यावरण व वातवरणीय बदल विभागाच्या ध्वनी प्रदूषण नियम व नियंत्रण सुधारित नियम, 2017 नुसार वर्षामध्ये एकूण 15 दिवस निश्चित करुन सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत लाऊड स्पिकर्सच्या वापरास सूट देण्याचे निश्चित करण्यासाठी संबंधित हे जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीनुसार सूट देण्यासाठीसुद्धा राखीव ठेवण्यात येतात.

हे ही वाचा – लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

यावर्षी नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करता यावा यासाठी 1 ऑक्टोबर, 2022 रोजी नवरात्रोत्सवासाठी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत लाऊड स्पीकरचा वापर करण्यास सूट देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतया वर्षी नवरात्रोत्सवासाठी सोमवार, 3 ऑक्टोबर आणि मंगळवार, 4 ऑक्टोबर यासोबतच शनिवार 1 ऑक्टोबर हा आणखी एक वाढीव दिवस वाढवून दिला आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांची कसर भरून निघणार आहे.

हे ही वाचा – महाराष्ट्र विद्यापीठ सुधारणा विधेयक अखेर मागे; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे महत्त्वाचे निर्णय