घरमुंबईमराठी तरुणाने बनवला इड्रो 3.0 रोबो

मराठी तरुणाने बनवला इड्रो 3.0 रोबो

Subscribe

रोबो करणार घरगुती मदतीबरोबर शेती काम

रजनीकांतचा नुकताच प्रसिद्ध झालेला ‘2.0’ हा रोबोवर आधारित चित्रपट सर्वांच्या पसंतीस पडत आहे. त्याचवेळी मुंबई आयआयटीमध्ये शुक्रवारपासून सुरू असलेल्या टेकफेस्टमध्ये मराठी तरुणाने बनवलेला ‘इंड्रो 3.0’ हा रोबो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. संपूर्ण भारतीय बनावटीचा असलेला हा रोबो घरातील सर्व कामे करतो, त्याचबरोबर घराची सुरक्षा, लहान मुलांवर लक्ष ठेवणे, अनोळखी व्यक्तीला घरात येण्यापासून रोखणे अशी सर्व महत्त्वाची कामे सहजगत्या करतो. रोबोची उंची व त्याची हालचाल टेकफेस्टला भेट देणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे लक्ष वेधून घेत आहे

वाढत्या महागाईमुळे घरातील पती-पत्नी दोघेही कामाला जातात. त्यामुळे कामाहून थकून घरी आल्यावर काम करण्याची इच्छा नसणे, त्याचबरोबर घरामधील लहान मुलांवर लक्ष ठेवणे, घरात होणारी चोरी, अनोळखी व्यक्ती यावर कुटुंबप्रमुखांना कोणत्याही प्रकारे नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे या बाबी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. ही बाब लक्षात घेऊन कामावर जाणार्‍या व्यक्तीला दिलासा मिळावा यासाठी 17 वर्षांपूर्वी मुंबईमधील संतोष वासुदेव हुलावले या कम्प्युटर इंजिनियर तरुणाने रोबो बनवण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

संतोषचा जन्म व शिक्षण मुंबईत झाले असले तरी पुण्यातील मुळशी हे त्याचे मूळ गाव आहे. सर्वसामान्यांच्या उपयोगी पडावा असा रोबो बनवण्यासाठी संतोषने अथक परिश्रम व संशोधनातून तब्बल 14 वर्षांनंतर मे 2016 मध्ये एक रोबो तयार केला. हा रोबो घरातील सर्व कामे सहजगत्या करत होता. परंतु या रोबोपेक्षा अधिक अत्याधुनिक रोबो बनवत त्याने सप्टेंबर 2017 मध्ये ‘इंड्रो 2.0’ तर 2018 मध्ये त्याने ‘इंड्रो 3.0’ हा रोबो बनवला. हा रोबो बनवताना संतोषला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु त्याने आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्व अडचणींवर मात करत ‘इंड्रो 3.0’ हा रोबो बनवला. हा रोबो बनवताना संतोषने लागणारा प्रत्येक भाग स्वत: बनवण्यावर भर दिला आहे. रोबोसाठी लागणार्‍या मोटर त्याने स्वत: संशोधन करून बनवल्या आहेत. त्यामुळे रोबो पूर्णत: भारतीय बनावटीचा आहे. जगामध्ये चीन व जपानच्या रोबोला मोठी मागणी असताना संतोषने बनवलेल्या या रोबोलाही चीन, अमेरिका, रशिया व सिंगापूर यासारख्या देशातून मोठ्या प्रमाणात मागणी येत आहे.

रोबोला भावना नसल्याने तो त्याचे काम करताना त्याच्या आड येणार्‍या अन्य कामाकडे दुर्लक्ष करत असतो. त्यामुळे घरगुती रोबोकडून खून होण्याची शक्यता अनेकांकडून व्यक्त करण्यात येत होती. मात्र संतोषने हीच गोष्ट लक्षात घेऊन आपल्या रोबोकडून अशी कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घेतली आहे. त्यामुळे त्याने रोबो मॅन्युअल मोडऐवजी अ‍ॅटोनॉमस मोडमध्ये काम करणारा बनवला आहे. त्यामुळे तो फक्त दिलेल्या सूचनांचेच पालक करतो. तर अन्य काम करण्यास थेटपणे नकार देतो. त्याची माहिती तातडीने त्याचे नियंत्रण असलेल्या व्यक्तीकडे पाठवतो. त्यामुळे या रोबोवर पूर्णपणे माणसाचे नियंत्रण राहते. पती व पत्नी दोघेही कामाला जातात.

- Advertisement -

त्यामुळे घरात लहान मुलांकडे व घराकडे लक्ष देण्यासाठी कोणीही नसते. अशावेळी घरात सीसीटीव्ही लावण्यात येतात. परंतु काही दुर्घटना घडल्यास सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यांना वाचवता येत नाही. परंतु रोबोला आपण तातडीने सूचना देऊन दुर्घटना टाळू शकतो. बंद घरामध्ये चोर्‍या होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात होतात. अशावेळी बंद घरामध्ये अनोळखी व्यक्ती शिरल्यास हा रोबो तातडीने तशी सूचना त्याचे नियंत्रण असणार्‍या व्यक्तीला पाठवतो. तसेच नियंत्रण असलेल्या व्यक्तीकडून आलेल्या सूचनांनुसार तो त्या व्यक्तीला रोखून ठेवतो. रोबो बनवता यावा यासाठी संतोषने रोबोटेक रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू केली. संतोषने रोबो बनवताना तो पूर्णत: भारतीय बनावटीचा असण्यावर भर दिला आहे. रोबोवर संशोधन करता यावे यासाठी संतोषने पुण्यामध्ये लॅबोरेटरी बनवली आहे. या रोबोची किंमत 10 लाखांपासून आहे. या रोबोची उंची 4.5 फूट इतकी आहे.

सर्वसामान्यांसाठी उपयोगी पडावा यासाठी मी रोबो बनवण्याचा निर्णय घेतला. हा रोबो बनवणे सोपे नव्हते. पण 44 प्रकारे संशोधन केल्यानंतर मला अपेक्षित रोबो तयार करण्यात यश आले. पण इंड्रो व इंड्रो 2.0 हे रोबो बनवल्यानंतर त्यांचे काम माझ्या अपेक्षेप्रमाणे होत नव्हते. त्यामुळे मी अधिक संशोधन करून इंड्रो 3.0 हा रोबो बनवला. जो सर्वसामान्यांसाठी उपयोगी पडत आहे. – संतोष हुलावले, संचालक,
रोबोटेक रिसर्च प्रा.लिमिटेड.

कोणती कामे करू शकतो

हा रोबो घरकामाप्रमाणे सुरक्षा, संरक्षण, इलेक्ट्रिक कामे, इन्फ्रास्ट्रक्चर, मध्यम आणि मोठ्या औद्यागिक कंपन्या, बचाव मोहीम, आपत्ती व्यवस्थापन, शेती, पाणी व्यवस्थापन, घनव्यवस्थापन, इंटिरियर, हॉटेल व्यवसाय, खाणी, उत्खनन, शिपिंग इंडस्ट्री व पाळत ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावू शकतो.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -