घरमुंबईनाल्यात आढळलेल्या अर्भकाची प्रकृती चिंताजनक

नाल्यात आढळलेल्या अर्भकाची प्रकृती चिंताजनक

Subscribe

उल्हासनगर येथून जवळच असलेल्या वडोल गावाच्या नाल्यात नवजात अर्भकाला फेकून देण्यात आले होते. बारा दिवसांपूर्वी अवघ्या एक-दिड तासापूर्वी जन्मलेल्या नवजात अर्भक बाळाला काळ्या पिशवीत बांधून निर्दयी मातेने नाल्यात फेकल्याची घटना उल्हासनगरात घडली होती. या अर्भकाची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्याला उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शिवाजी रगडे या स्थानिक समाजसेवकाने या अर्भकाचे प्राण वाचवले होते. त्यानेच उपचाराचा खर्च करण्याची जबाबदारी घेतली आहे.

हे अर्भक मुलगा असून त्याच्यावर मध्यवर्ती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. परंतू बाळाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नव्हती. उलट दिवसेंदिवस ढासळत चालली होती. अर्भकाच्या नाका-तोंडात सांडपाणी गेल्याने त्याच्याकडून उपचारासाठी प्रतिसाद मिळत नाही. त्याच्या नाभी सभोवतालचा अर्थात पोटाचा भाग हिरवट पडला आहे. या बालकावर उपचार करण्याकरता हॉस्पिटलमध्ये सुविधा नसल्याचे अंबरनाथ ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक टी. के. सावंत यांना कळवण्यात आले होते. सावंत यांनी बाल न्यायालय भिवंडी येथे अर्ज केला. त्यात नवजात बालकाला खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात औषधोपचार करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

त्यासाठी बालकाची फिर्याद देणारे सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे यांनी त्याच्या प्रकृतीत सुधारणा होईपर्यंत वैद्यकीय खर्च करण्याची तयारी ठेवली आहे, असे नमूद केले होते. त्यानुसार कोर्टाने पोलिसांना बाळाला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची परवानगी दिली आहे. अंबरनाथ ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम. के. चौहान यांनी बाळाचा उपचारासाठीचा ताबा पोलिसांना द्यावा, असे पत्र शासकिय हॉस्पिटलमध्ये दिल्यावर बाळाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस बी. एम. पाटील, किशोर पेटारे, महिला पोलीस श्वेता गमरे, डॉ. जान्हवी भोसले, डॉ. प्रसन्नजीत जाधव यांच्या उपस्थितीत बाळाला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -