घरमुंबईमंत्रालयातील इंटरनेट सेवा बंद; प्रवेश पास न मिळल्याने नागरिकही खोळंबले

मंत्रालयातील इंटरनेट सेवा बंद; प्रवेश पास न मिळल्याने नागरिकही खोळंबले

Subscribe

जवळपास तासभर इंटरनेट(internet) सेवा बंद असल्याने लोकांचा खोळंबा झाला. त्याचसोबत काही महिन्यांपूर्वी मंत्रालयातील(mantralay) लाईट्स सुद्धा अचानक गेल्याने कामाचा खोळंबा झाला होता.

मागील महिन्याभरापासून राज्यमंत्रिमंडळाचा खोळंबलेला विस्तार अखेर पार पडला आणि राजकारणाच्या या घडामोडींमध्ये जी कामं रखडली होती. ती कामं पूर्ण करण्यासाठी अनेकांनी मंत्रालयात घाव घेतली. पण मंत्रालयातील इंटरनेट सेवा बंद असल्याने लोकांना मंत्रालयात प्रवेश मिळाला नाही. जवळपास तासभर इंटरनेट(internet) सेवा बंद असल्याने लोकांचा खोळंबा झाला. त्याचसोबत काही महिन्यांपूर्वी मंत्रालयातील(mantralay) लाईट्स सुद्धा अचानक गेल्याने कामाचा खोळंबा झाला होता.

हे ही वाचा – शिंदे गटातील नव्या मंत्र्यांची बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट; पदभार स्वीकारण्यापूर्वी घेतले आशीर्वाद

- Advertisement -

मंत्रालयातील(mantralay) इंटरनेट सेवा बंद असल्याने राज्यभरातून कामानिमित्त आलेल्या लोकांचा खोळंबा झाला. साडेदहा वाजल्यापासून पास मिळत नसल्याने लोकांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाला. मंत्रालयात आज इंटरनेटची सेवा बंद होती. त्याप्रमाणेच या आधीही मंत्रालयात लाईट गेल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. २६ मे २०२२ रोजी सुद्धा मंत्रालयात बत्ती गुल झाली होती. मंत्रिमंडळ बैठक म्हटलं की राज्यातील सर्वच मंत्री मंत्रालयामध्ये दाखल होतात अशातच मंत्रालयामधील काही विभागांमध्ये लाईट गेल्या. पण त्याही वेळी मंत्रालयात मंत्री दाखल होण्या अगोदरच लाईट गेल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे.

Mantralay

- Advertisement -

यासोबतच ११ मे २०२२ रोजी सुद्धा संध्याकाळी ४ वाजून २० मिनिटांनी मंत्रालयात बैठक सुरु झाली. वैठक सुरु असतानाच ५ वाजून ३० मिनिटांनी मंत्रालयातील लाईट्स अचानक गेल्या. दरम्यान या दोन्ही वेळी लाईट्स गेल्यामुळे मंत्रालयात कामाचा खोळंबा झाला.

हे ही वाचा – पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम जाहीर, जाणून घ्या कसे होणार कामकाज?

दरम्यान आज राक्षबंधांच्या दिवशी मंत्रालयातील कामकाज सुरु ठेवण्यात होते. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणांहून कामकाज पूर्ण करण्यासाठी लोकांची रीघ लागली होती. मंत्रालयात बाहेरून कामानिमित्त आलेल्या नागरिकांना प्रवेशासाठी पास देण्यात येतो. इंटरनेट सेवा बंद असल्याने हा पास नागरिकांना मिळू शकला नाही त्यामुळे मंत्रालयाच्या(mantralay) आवाराबाहेर नागरिकांची रीघ दिसुन आली. बीड, नागपूर, आणि रायगड या भागातून मंत्रालयात लोक आले होते.

हे ही वाचा – आतापर्यंत शांत होतो, यापुढे कायदेशीर नोटीस देणार; संजय राठोडांचा चित्रा वाघ यांना इशारा

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -