घरCORONA UPDATEनालेसफाई नाही ही तर हात सफाई - आशिष शेलार

नालेसफाई नाही ही तर हात सफाई – आशिष शेलार

Subscribe

नालेसफाई झाली तर गाळ कुठे टाकला, असा सवाल करत शेलार यांनी ही नालेसफाई नव्हे, ही तर हात सफाई असल्याची टीका शेलार यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेने यंदा पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या ७० टक्के सफाईच्या तुलनेतही एकूण ११३ टक्के नालेसफाईचा दावा केला आहे. मात्र, यावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सवाल उपस्थित केला आहे. नालेसफाई झाली तर गाळ कुठे टाकला, असा सवाल करत शेलार यांनी ही नालेसफाई नव्हे, ही तर हात सफाई असल्याची टीका शेलार यांनी केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळातही मुंबई महापालिकेच्यावतीने नालेसफाईचे काम हाती घेत कंत्राटदारांकडून कामे करून घेतली. पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोरोना काळातही नालेसफाईच्या कामात ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवत सफाईचे काम पूर्ण करून घेतले आहे. पावसाळ्यापूर्वी एकूण नालेसफाईच्या ७० टक्के एवढे सफाईचे काम केले जात आहे. पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख अभियंता संजय जाधव यांनी पदभार स्वीकारताच कोरोनाच्या महामारीचा कालावधी सुरु झाला. तरीही त्यांनी विभागाच्या अभियंत्यांना विश्वासात घेवून नालेसफाईचे काम पूर्ण करण्याचे आव्हान पेलले. पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या ७० टक्के नालेसफाईच्या कामांमध्ये २लाख ५३ हजार ३१५ मेट्रीक टन एवढा काढणे अपेक्षित होते. त्यातुलनेत २ लाख ८७ हजार ५२४ मेट्रीक टन एवढा गाळ काढण्यात आला आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. त्यामुळे १२ जूनपर्यंत सरासरी ११३ टक्के एवढे काम पूर्ण केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

- Advertisement -

याबाबत भाजपचे माजी मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष  शेलार यांनी महापालिका प्रशासनावर जोरदार टिका केली आहे. मुंबईकर म्हणतात ४० टक्के पेक्षाही जास्त सफाई झालेली दिसली नाही. त्यामुळे ११३ टक्केचा दावा २२७ टक्के खोटा आहे. जर  नालेसफाई झाली तर गाळ कुठे टाकला? वजन काट्याची आकडेवारी जाहीर का करत नाहीत? सी.सीटीव्ही फुटेज का जाहीर करत नाही. त्यामुळे ही नालेसफाई नव्हे, ही तर हातसफाईच असल्याचा आरोप शेलार यांनी केला.

मुंबई महापालिकेकडून दरवर्षी नालेसफाईच्या आकडेवारीचा डोंगर उभा केला जातो. आयुक्त मोठमेाठे दावे करतात आणि पहिल्याच पावसात सगळेच दावे  वाहून जातात. नव्या आयुक्तांनी यावर्षी ११३ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला. टेंडरपासून सफाईपर्यंत आकडेवारीचीच हातसफाई वर्षानुवर्षे सुर असल्याची टिकाही त्यांनी केली आहे.

- Advertisement -

आतापर्यंत १ लाख ७ हजार मेट्रीक टन गाळाची वाहतूक

२ लाख ८७ हजार ५२४ मेट्रीक टन एवढा गाळ काढण्यात आला आल्याचा दावा प्रशासनाने केला असला प्रत्यक्षात १ लाख ०७ हजार ७६ मेट्रीक टन एवढ्या गाळाचीच वाहतूक करण्यात आली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. नालेसफाईचे काम झाल्यानंतर त्यातील गाळ नाल्याशेजारी काढून ठेवला जातो आणि सुकल्यानंतर वजन काट्यावर नेवून मोजमाप करत निश्चित केलेल्या डम्पिंग ग्राऊच्या जागी टाकला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -