घरमुंबई'जेरूसलेम गेट'- ज्यू धर्मियांची अलिबागशी जोडलेली नाळ

‘जेरूसलेम गेट’- ज्यू धर्मियांची अलिबागशी जोडलेली नाळ

Subscribe

जेरूसलेम गेटच्या बाबतीत नुकताच एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणाचा जागतिक पर्यटन स्थळ म्हणून विकास केला जाणार आहे. या निर्णयामुळे ज्यू धर्मियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

भारतात ज्यू लोकांनी पहिल्यांदा ज्या ठिकाणी पाय ठेवले ते हे अलिबाग तालुक्यातील नवगाव ज्यू धर्मीयांमध्ये पवित्र ‘जेरुसलेम गेट’ म्हणून ओळखले जाते. याच ‘जेरुसलेम गेट’ स्थळाचा जागतिक पर्यटन स्थळ म्हणून विकास केला जाणार आहे. इस्त्रायलमध्ये गेलेल्या ज्यू बांधवांनी रविवारी अलिबागयेथील नवगाव या ठिकाणी भेट दिली. देवून भारतातील या आपल्या पहिल्या आश्रयस्थळाचा विकास करण्याचा संकल्पना त्यांनी जाहीर केली. जेरुसलेम गेटला भेट देण्यासाठी २००हून अधिक ज्यू नागरिकांनी हजेरी लावली. यामध्ये अमेरिका आणि फ्रान्समध्ये स्थायिक झालेल्या ज्यू बांधवांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

 ट्रस्ट स्थापन केली जाणार

या सर्व ज्यूईश बांधवांनी नवगाव येथे आमदार जयंत पाटील यांच्याशी संवाद साधताना जेरुसलेम गेट या पवित्रस्थळाच्या विकासासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. विनंती मान्य करुन बोलताना आमदार जयंत पाटील यांनी, नवगाव या ठिकाणी असलेल्या ‘जेरुसलेम गेट’ या स्थळाचा विकास करताना स्मृतिस्तंभाची बांधणी, परिसराचे सुशोभिकरण, विद्युत व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी एक ट्रस्ट स्थापन केला जाणार असून पुरातत्व विभागाच्या तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी इतिहास तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे. हिंदू-ज्यू संबंध अधिक वृद्धीगत व्हावेत, यासाठी जगभरातून नवगाव येथे आलेल्या ज्यू बांधवांनी आमदार जयंत पाटील यांना तीळगुळ देवून मैत्रीचा धागा अधिक बळकट केला. रायगडमधून ज्यू लोक जाऊन मोठा कालावधी लोटला आहे. तरीही त्यांनी येथील मातीशी नाते तोडलेले नाही. नवगाव या ठिकाणी दुरवस्थेत असलेले हे स्थळ विकसीत केल्यास भारत आणि इस्त्नाएलमधील नातेसंबंध अधिक दृढ होतील असा विश्वास आ.पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisement -

“ज्यू धर्मीयांवर जगातील अनेक देशांमध्ये अत्याचार झाले. मात्र, भारतात आलेल्या ज्यू धर्मीयांना सन्मानाची वागणूक मिळाली. दोन हजार वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत हा समाज येथील इतर समाजाशी पूर्णपणो एकरुप झाला. आजच्या घडीला जगभर हदशतवादी हल्ले वाढत असताना ‘जेरुसलेम गेट’ हे जागतिक शांततेचे प्रतिक होईल.”- जेष्ठ ज्यू बांधव जॉनथन सोलमन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -