घरमुंबईखारघरमधील मृतांची संख्या जास्तच, जितेंद्र आव्हाडांचा दावा

खारघरमधील मृतांची संख्या जास्तच, जितेंद्र आव्हाडांचा दावा

Subscribe

मुंबई : खारघरमध्ये रविवारी (16 एप्रिल) निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्करा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित असलेल्या श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास होऊन मृत्यू झाला, मात्र हे मृत्यू शिंदे सरकारने घडवून आणले असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की, डोळ्यांना बरं वाटावे म्हणून गर्दी जमवण्यात आली, पण त्यात श्री सदस्यांचा मृत्यू झाला आणि शिंदे सरकारकडून मृतांची संख्या लपवली जात आहे.

रविवारी खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून श्री सदस्य मोठ्या प्रमाणावर दाखल झाले होते. मात्र, कार्यक्रमानंतर उष्माघातामुळे 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला आणि एकच खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळात याचे पडसाद आजही उमटत आहेत.

- Advertisement -

व्हिडीओचा संदर्भ देत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आमच्या एका मित्राने मला खारघर घटनेचा व्हिडीओ पाठवला. या व्हिडीओवरून उष्माघाताचे बळी आहेत असे कुठेही दिसून येत नाही. चेंगराचेंगरीमध्ये जीव गुदमरून मृत्यू झाला असावा, असा माझा प्राथमिक अंदाज आहे, पण मी त्यातला तज्ज्ञ नाही. व्हिडीओमध्ये चेंगराचेंगरी दिसत असून त्या ठिकाणी चार-पाच खाली पडल्याचे दिसत आहे. त्या व्हिडीओत एक मुलगा आईला उठवण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. जो व्हिडीओ समोर आला आहे तो त्या मैदनातील एका भागातील आहे. तो भाग पाहिला तर त्याच्या हजारपट लोक इतर भागात असतील. त्यामुळे शासनाकडून जी काही परिस्थिती सांगितली जाते आहे, तेवढी ती सोपी आणि सहज नक्कीच नव्हती, असेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.

श्री सदस्य सरकारवर नाराज असतील
कार्यक्रम सरकारचा अस्लयाने मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवण्यात आली होती. कार्यक्रमाच्या आदल्या दिवसापासून आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे श्री सदस्य जमा झाले होते. सरकारने या सगळ्या गर्दीचा फायदा घेतला, मात्र यावेळी मृत्यू झालेल्या श्री सदस्यांच्या नातेवाईकांना फक्त पाच लाखांची मदत सरकारकडून करण्यात आली. किमान एक कोटींची मदत केली पाहिजे होती. ज्या श्री सदस्यांना खुश करण्यासाठी हा सगळा घाट घातला होता ते श्री सदस्य सरकारवर नाराज असतील, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -