आव्हाडांनी दिपाली सय्यदची ‘अशी’ केली पाठवणी; गायलं हे गाणं!

" बाबूल की दुआए लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले. मयके की कभी ना याद आये, ससूराल मे इतना प्यार मिले "

jitendra avhad slams on modi through song

मुंब्रा कळवा विधानसभा मतदार संघात शिवसेनेने अभिनेत्री दिपाली सययद ला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड विरूध्द दीपाली सययद असा सामना रंगणार आहे. दोघांनीही उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. मात्र आव्हाडांनी सययद यांच्यासाठी खास गाणं गाऊन प्रतिक्रिया दिली आहे. ” बाबूल की दुआए लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले. मयके की कभी ना याद आये, ससूराल मे इतना प्यार मिले ” हे गाण आव्हाडांनी गायलं. पंधरा दिवसांसाठी आलेली आमची माहेरवाशीण बहीण आमच्या मानवी धर्माप्रमाणे तिचं औक्षण होईल तिला खूप माया दिली जाईल आणि त्यानंतर दीड लाखांच्या फरकाने तिला सासरी पाठविण्याची व्यवस्था केली जाईल असेही आव्हाड म्हणाले.

गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आव्हाड यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भव्य रॅली काढली हेाती. मात्र वेळेअभावी उमेदवारी अर्ज भरला नव्हता. त्यामुळे शुक्रवार आव्हाड यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. आव्हाड हे दोन वेळा निवडून आले आहेत. यंदा आव्हाड हॅट्रीक साधण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेने अभिनेत्री दीपाली सययद यांना उमेदवारी देऊन रिंगणात उतरवले आहे.

२०१४मध्ये आपची होती उमेदवारी!

२०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये अभिनेत्री दिपाली सय्यदने आम आदमी पक्षाच्या तिकिटावर अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा या निवडणुकीत मोठा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी विनायक मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेच्या महिला अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. नुकताच त्यांनी सिंचनासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्यामुळे त्यांचा मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला होता.