घरमुंबईजितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त ट्विट; धनगर समाज संतप्त

जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त ट्विट; धनगर समाज संतप्त

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमादर जितेंद्र आव्हाड यांनी केलेले ट्विटमुळे धनगर समाज संतप्त झाला आहे. त्यांनी अवघ्या १५ मिनिटामध्ये ट्विट डिलिट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त ट्विट केले आहे. ‘या देशात वाल्याचा वाल्मिकी होतो आणि मल्ल्याचा मल्हारराव होळकर होतो’ असे ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे मल्हारराव होळकरप्रेमी आणि धनगर समाज संतप्त झाला आहे. आव्हांडाचे ट्विट सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. होळकर प्रेमींनी आव्हाडांच्या ट्विटचा निषेध केला आहे. `बघा या भ्रष्टवादी वाल्यांची समाजाबद्दल असणारी भावना’, जितेंद्र आव्हाड महाराष्ट्राला कलंक आहे, वाचाळवीर अशा शब्दामध्ये आव्हाडांचा निषेध केला आहे.

मल्ल्याचा मल्हारराव झाला

प्रहारने दिलेल्या वृत्तानुसार जितेंद्र आव्हाड यांनी असे सांगितले आहे की, मल्हारराव होळकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मात करून मोठं राज्य स्थापन केले. त्यांना कोणताही वारसा नव्हता. सामान्य माणूस किती मोठं कर्तृत्व दाखवू शकतो असे म्हणायचे होते पण त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. या ट्विटमुळे वाद निर्माण होऊ नये यासाठी ते १५ मिनिटामध्ये डिलिट करण्यात आले. फलटणसारख्या ग्रामिण भागामध्ये मल्हाररावाची शेती होती त्या शेतातून मराठ्यांचे घोडेस्वार जात होते. त्यामुळे त्यांच्या शेताचे नुकसान होत हेत. एक दिवस त्यांनी मराठा सैनिकांना माझ्या शेतातून जायचे नाही असा इशारा दिला. मल्हाररावांचे हे धैर्य पाहून पेशवे भारावून गेले होते. लहान मल्ल्या मराठा सैन्यात दाखल झाला, अन् पुढे स्वतःच्या कर्तृत्वाने पुढे मल्हारराव झाला. बहुजन समाजातील अशा मोठ्या व्यक्तीबद्दल वाईट शब्द उच्चारणे माझ्या रक्तात नाही. तरीही बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर मी क्षमा मागतो, असे देखील आव्हाडांनी सांगितले आहे.

- Advertisement -

१५ मिनिटात ट्विट केले डिलिट

दरम्यान, आव्हाडांच्या ट्विटवरुन त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच त्यांनी ते ट्विट डिलीट केले. त्यानंतर त्यांनी ट्विटवरुनच धनगर समाज बांधवांची माफी मागितली. माझ्या कडून भावना दुखावल्या गेल्या असतील तर माफी असावी असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -