घरताज्या घडामोडीCoronavirus - बुधवारपासून कल्याण एपीएमसी मार्केट बंद!

Coronavirus – बुधवारपासून कल्याण एपीएमसी मार्केट बंद!

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण एपीएमसी मार्केट बुधवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मोठया प्रमाणात भाजीपाला व इतर वस्तूंचा तुटवडा पडण्याची शक्यता आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगार गावी गेल्याने तेथील व्यापारी व संचालक मंडळाने बाजार समिती ३१ मार्च पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर मोठा ताण येण्याची शक्यता होती. मात्र येथील माथाडी कामगार देखील कामावर येत नसल्याने तसेच व्यापारी वर्गाने सुरक्षेसाठी मार्केट बुधवार पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारा शेतमाल मोठया प्रमाणात राज्यातील पुणे, मंचर, ओतूर, नारायणगाव, नगर, नाशिक, जळगाव, या विभागातून येतो. तसेच गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली या राज्यातून देखील येतो. या सर्वच ठिकाणी असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्याने व शेतकरी बांधवांनी घरीच राहणे पसंत केल्याने भाज्यांची आवक प्रचंड घटली आहे. यामुळे पुढील दोन दिवसात भाज्यांचा मोठा तुटवडा होऊ शकतो.

- Advertisement -

भाज्यांच्या दरात वाढ

भाज्यांच्या अपूऱ्या पुरवण्यामुळे भाज्यांच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. ५० रुपये किलो असणाऱ्या मिरचीचे दर किलोमागे ७५ रुपये झाले आहेत. तर कोबी ५० रूपये किलो झाला आहे. वांग्याचे ८० रुपये झाले आहेत. तर मेथीची जूडी, कोथींबरीच्या जूडीच्या दरातही वाढ झाली आहे.


हे ही वाचा – Coronavirus – मुंबईकरांच्या ताटातून भाजी गायब? भाजीआवक उद्यापासून बंद!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -