घरठाणेKalyan : धावती डेक्कन क्वीन एक्स्प्रेस पकडणे जीवावर बेतले; दोन भावांपैकी एकाचा...

Kalyan : धावती डेक्कन क्वीन एक्स्प्रेस पकडणे जीवावर बेतले; दोन भावांपैकी एकाचा दुर्दैवी मृत्यू

Subscribe

Kalyan : धावती डेक्कन क्वीन एक्स्प्रेस (Deccan Queen Express) पकडणे दोन भावांच्या जीवावर बेतले आहे. या अपघातात एका मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी असल्याचे समजते. कल्याण स्थानकात हा अपघात घडला असून जखमीला हमालांनी रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. (Kalyan Catching the runaway Deccan Queen Express is life threatening Unfortunate death of one of the two brothers)

हेही वाचा – पोलिसांना 2024 मध्ये सगळ्या खोट्या गुन्ह्यांचा जबाब द्यावा लागेल; रश्मी शुक्लांचा संदर्भ देत राऊतांचा इशारा

- Advertisement -

पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेसला अप मार्गे मुंबईकडे येताना कल्याण स्थानकात हा अपघात घडला आहे. कल्याण रेल्वे स्थानकात डेक्कन क्वीन एक्स्प्रेला थांबा नसताही धावती एक्स्प्रेस पडकण्याचा दोन भावांची प्रयत्न केला, यावेळी त्यांचा तोल जाऊन दोघेही रुळावर पडले. यात एका भावाचा मृत्यू झाला आहे तर, एक गंभीर असल्याचे समजते. आज सकाळी 9.30 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. मृत व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही, मात्र दुसऱ्या जखमीला उपचारासाठी कल्याण महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कल्याण स्थानकात एक्स्प्रेसला थांबा नसतानाही ती पकडण्याचा मोह दोन्ही भावांना भोवला आहे. मात्र कल्याण स्थानकात डेक्कन क्वीन एक्स्प्रेसचा वेळ मर्यादित असल्याने दुसऱ्याचा जीव वाचल्याचे समजते.

हेही वाचा – Mumbai News : महिलांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रस्ताव वर्षभरापासून मंजुरीच्या प्रतीक्षेत

- Advertisement -

डेक्कन क्वीन एक्सप्रेसला कल्याण स्थानकात थांबत नाही. मात्र ही एक्सप्रेस पकडण्याचा दोन ते तीन प्रवाश्यांनी प्रयत्न केला. यावेळी त्यांचा तोल जाऊन दोन भाऊ रूळावरच पडल्याची माहिती त्याठिकाणी उपस्थित इतर प्रवाशांनी दिली आहे. आरपीएफ, जीआरपी टीम घटनास्थळी दाखल व्हायच्या आधी प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या रेल्वे पोलिसांनी हमालांच्या मदतीने एका जखमीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली.

प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी सांगितले की, कल्याण लोहमार्ग पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे. तसेच हे दोन्ही भाऊ पुणे येथून मुंबईला येण्यासाठी निघाले होते. मात्र हा अपघात झला. सध्या जखमीची तब्येत स्थिर असून तो काही वेळात या घटनेची माहिती देईल आणि मृत व्यक्तीचे नावही सांगेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -