घरमुंबईखासदार निधीतून झाली कल्याण मतदारसंघातील विकास कामे

खासदार निधीतून झाली कल्याण मतदारसंघातील विकास कामे

Subscribe

कल्याण मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खासदार निधीतून चार वर्षांमध्ये २२ कोटी ३७ लाखांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. खासदार निधी हा रस्ते पायवाटा आणि गटारांच्या कामांसाठी वापरण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रस्ते पायवाटा आणि गटारे या नागरी सोयी सुविधांची कामे स्थानिक स्वराज्य संस्थेकडून केली जातात. मात्र, खासदार निधी रस्ते पायवाटा आणि गटारांच्या कामांसाठी वापरण्यात आला आहे. कल्याण मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खासदार निधीतून चार वर्षांमध्ये २२ कोटी ३७ लाखांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. राज्यातील सर्वाधिक निधी खर्च करणाऱ्या खासदारांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर शिंदे आहेत. पण खासदार निधी हा रस्ते पायवाटा आणि गटारांच्या कामांसाठी वापरण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

१६९ पैकी ८५ कामे पूर्ण

खासदारांना दरवर्षी ५ कोटी रूपये विकास निधी असतो. दरवर्षी त्यांच्या मतदार संघात विकास कामे करण्यासाठी शासनाकडून हा निधी दिला जातो. खासदारांनी कामे जिल्हाधिकाऱ्यांना सुचवायची असतात, त्यासाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून दिला जातो. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुमारे २२ कोटी ३७ लाखांपर्यंतचे प्रस्ताव प्रशासनाला सादर केले असून त्याला मंजुरी देण्यात आली आहे. खासदार निधीतील १६९ कामांपैकी ८५ कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे ही प्रगतीपथावर आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांचा समावेश अधिक आहे. तसेच संगणक पुरविणे आणि उद्यान आणि चौक सुशोभिकरणाच्या कामांना खासदार निधी देण्यात आला आहे.

- Advertisement -

खासदार निधी वापरल्याने आर्श्चय व्यक्त

दरम्यान, खासदार शिंदे यांनी २०१४ ते मार्च २०१८ पर्यंत २० कोटी ३७ लाखांचा निधी खर्च केला आहे. ठाणे जिल्हा नियोजन विभागाकडून खासदार निधीसाठी देण्यात आलेल्या रकमेची आणि त्या माध्यमातून झालेल्या कामांतून ही माहिती मिळाली आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण, डांबरीकरण करणे, उद्यान सुशोभिकरण, संगणक खरेदी, रुग्णवाहिका खरेदी, समाजमंदीर अभ्यासिका मलंगडावर पायऱ्या बांधणे, कुपनलिका, पायवाटा गटार बांधणे, नाना नानी पार्क, आदी कामांमध्ये खासदार निधीचा वाटा देण्यात आला आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी गटार पायवाटांच्या कामांना ब्रेक लावला होता. मात्र, त्याच कामांसाठी खासदार निधी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -