घरक्राइमKalyan Firing : आमदार गणपत गायकवाडांचा तुरुंगातील जेवणास नकार; कुटुंबीयांना भेटू देत...

Kalyan Firing : आमदार गणपत गायकवाडांचा तुरुंगातील जेवणास नकार; कुटुंबीयांना भेटू देत नसल्याने नाराज

Subscribe

भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेतील (शिंदे गट) शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात जागेवरून वाद निर्माण झाला होता. हा वाद सोडवण्यासाठी दोघांना उल्हासनगर पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी उल्हासनगरच्या हिललाइन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या.

मुंबई : भाजप आमदार गणपत गायकवाडांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. सध्या ते पोलीस कोठडीत असून, त्यांनी मात्र अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. विशेष म्हणजे गायकवाड यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटू देत नल्याने ते नाराज असल्याची माहिती आहे. याच नाराजीतून त्यांनी अन्नत्याग केलं असल्याची माहिती पुढे येत आहे. (Kalyan Firing MLA Ganpat Gaikwads refusal to eat Displeased because he is not allowed to meet his family)

भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेतील (शिंदे गट) शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात जागेवरून वाद निर्माण झाला होता. हा वाद सोडवण्यासाठी दोघांना उल्हासनगर पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी उल्हासनगरच्या हिललाइन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या. या प्रकारानंतर खळबळ उडाली. राज्य शासनाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला. सध्या गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. दरम्यान आमदार गणपत गायकवाड यांनी अन्नत्याग केला असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : PM Modi : ‘भानुमति का कुनबा…’, आघाडीचे अलायनमेंट बिघडले! मोदींचा ‘इंडिया’वर हल्लाबोल

आरोपींना घरचे जेवण बंद

आमदार गणपत गायकवाड यांच्यासह त्यांचे दोन साथीदार हर्षल केणे आणि संदीप सरवणकर यांना भेटण्यासाठी कळवा पोलीस आणि गुन्हे शाखेचे विशेष पोलीस पथक तयार करण्यात आले आहे. या तीनही आरोपींना घरचं जेवण देण्यास बंदी घाल माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष पथकाकडून तीनही आरोपींना जेवण, नाश्ता आणि चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आहे.

- Advertisement -

हेही वाचा : लोकसभेसाठी ठाकरे कोकणात, राऊत मविआच्या बैठकीत तर अंधारेंचा दौरा

महेश गायकवाड यांच्या प्रकृतीत सुधारणा

महेश गायकवाड यांच्या शरीरातून सहा गोळ्या काढण्यात आल्या. त्यानंतर आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होता आहे. तसंच, राहुल पाटील यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं. दुसरीकडे आमदार गणपत गायकवाड यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी डॉक्टरांचे पथक पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -