घरमुंबईराज्य उत्पादन शुल्क कार्यालयातून चक्क दारू बनविण्याचे साहित्य चोरीला

राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातून चक्क दारू बनविण्याचे साहित्य चोरीला

Subscribe

कल्याणच्या राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातच चोरी झाल्याची खळबळजनक घटना समोर आली असून चक्क दारू बनविण्याचे साहित्य चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे.

शहरात चोरटयांनी धुमाकूळ घातला असतानाच आता सरकारी कार्यालयांनाही लक्ष केले आहे. कल्याणातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातील स्टोर रूमचे कुलूप तोडून चोरट्यांनी गावठी दारू बनविण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य चोरून नेल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. चोरट्याने चक्क दारू बनविण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य चोरले आहे. हे साहित्य पोलिसांनी जप्त करुन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातील स्टोर रूममध्ये ठेवले असल्याचे समोर आले आहे.

दारू बनविण्याचे साहित्य चोरले

कल्याण पश्चिमेतील कर्णिक रोड येथे राज्य उत्पादन विभागाचे कार्यालय असून कार्यालयाच्या मागील बाजूस स्टोअर रूम आहे. या स्टोअर रुममधून सामान चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे. राज्य उत्पादन विभागाकडून केलेल्या कारवाईचे जप्त केलेले सामान स्टोअर रूममध्ये ठेवण्यात आले होते. सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी कार्यालयातील स्टोअर रूमचे कुलूप तोडून विभागाने जप्त केलेले गावठी दारू बनविण्याचे साहित्य चोरून नेले. गेल्या अनेक दिवसांपासून विभागाकडून गावठी दारूचे अड्डे उध्दवस्त करून कारवाईचे प्रकार सुरू आहेत. हा जप्त केलेला माल चोरटयांनी चोरून नेल्याने आश्चर्य व्यक्त हेात आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच डोंबिवली पूर्वेतील कोळेगाव येथील सुजित म्हात्रे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरटयांनी घरातील ७१ हजार रूपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली शहरात दररोजच घरफोडी आणि चोरीचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -