घरमुंबईकिडनी दानातून दोघांना जीवदान

किडनी दानातून दोघांना जीवदान

Subscribe

अवयवदानाबाबत वाढलेल्या जनजागृतीमुळे अनेक कुटुंब आपल्या प्रिय व्यक्तीला अवयवरुपी जीवंत ठेवता येऊ शकतं या हेतूने अवयवदानासाठी स्वत: हून पुढाकार घेत आहेत. एका ५३ वर्षीय व्यक्तीने केलेल्या अवयवदानातून दोघांची किडनीची प्रतिक्षा संपली आहे. या व्यक्तीच्या अवयवदानामुळे दोघांना नवं आयुष्य मिळालं आहे. २१ जूनला केलेलं हे अवयवदान मुंबईतील ४८ वं आहे.

अवयव दानासाठी कुटुंबियांनी दिली परवानगी

नवी मुंबईतील ५३ वर्षांच्या व्यक्तीचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाला. यानंतर त्यांना वाशीतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती खूप गंभीर होती. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले. पण, डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. २१ जून, २०१९ ला या व्यक्तीला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केलं. या व्यक्तीच्या कुटुंबाला अवयवदानाविषयी माहिती आणि जागरुकता असल्यामुळे या व्यक्तीचे अवयवदान करण्यात आले.

याविषयी अपोलो हॉस्पिटलचे प्रवक्ते सतीश मंजुनाथ यांनी सांगितलं की, ” या व्यक्तीचं कुटुंब अवयवदानाबाबत जागरूक होतं. त्यामुळे, आपला रुग्ण ब्रेनडेड झाल्याचं समजताच त्यांनी त्यांचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला, त्यांचं समुपदेशन केलं गेलं. या व्यक्तीच्या दोन्ही किडनी दान करण्यात आल्या. कुटुंबाच्या परवानगीनुसार या रुग्णाच्या दोन्ही किडनी दान करण्यात आल्या. एक किडनी अपोलो हॉस्पिटलमधील आणि दुसरी किडनी एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमधील रुग्णांना दान करण्यात आल्या. ”

- Advertisement -

सूरतचं हृदय मुंबईत

सूरतच्या ५४ वर्षीय महिलेचं हृदय आणि फुप्फुस मुंबईतील एका रुग्णाला दान करण्यात आलं आहे. फोर्टिस हॉस्पिटलमध्ये ही व्यक्ती उपचार घेत होती. या महिलेचं फुफ्फुस, हृदय, दोन्ही किडनी आणि डोळे दान करण्यात आले आहेत. सुरतमधील हे दुसरं फुफ्फुस आणि २३ वं हृदयदान आहे.

डोनेट लाईफचे संस्थापक निलेश मंडलेवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ या महिलेचं फुफ्फुस आणि हृदय मुंबईच्या मुलुंड फोर्टिस रुग्णालयात पाठवण्यात आलं. एकाच रुग्णावर हे दोन्ही अवयव प्रत्यारोपित करण्यात आले. तर, दोन्ही किडनी इन्स्टिट्युट ऑफ किडनी डिसीज आणि रिसर्च सेंटर (IKDRC) मध्ये पाठवण्यात आलेत आणि डोळे लोकदृष्टी चक्सू बँकेत पाठवण्यात आलेत.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -