घरमुंबईमेधा किरीट सोमय्या अडचणीत?

मेधा किरीट सोमय्या अडचणीत?

Subscribe

मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील सीआरझेड व बफर झोन परिसरात पर्यावरण विभागाची परवानगी न घेता १६ ठिकाणी शौचालयांची बांधकामे केल्याप्रकरणी पर्यावरण विभागाकडून जागेची पाहणी करण्यात आली आहे.

मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील सीआरझेड व बफर झोन परिसरात पर्यावरण विभागाची परवानगी न घेता १६ ठिकाणी शौचालयांची बांधकामे केल्याप्रकरणी पर्यावरण विभागाकडून जागेची पाहणी करण्यात आली आहे. युवक प्रतिष्ठानच्या संचालिका मेधा सोमय्या यांनी पती आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या राजकीय शक्तीचा वापर करून सार्वजनिक शौचालयांची कंत्राटे मिळवून हे बांधकाम केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी विधिमंडळात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यावरून वन विभागाने चौकशी सुरू केली असून यामुळे मेधा सोमय्या अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

युवक प्रतिष्ठानच्या संचालिका मेधा सोमय्या यांनी सार्वजनिक शौचालयांची कंत्राटे मिळवून तब्बल १६ ठिकाणी अशी बांधकामे केली. त्यांनी मीरा-भाईंदर महापालिका अधिकार्‍यांची फसवणूक करून खोटी कागदपत्रे सादर करून शौचालयांची ३ कोटी ९० ५२ रुपयांची बिलेसुद्धा घेतली, अशी तक्रार करण्यात आली होती. विधिमंडळाच्या अधिवेशनात गृहराज्यमंत्री यांनी मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त व आर्थिक गुन्हे शाखा मुंबई यांना चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी १८ मार्च २०२१ रोजी शासनाकडे अहवाल सादर केला आहे. त्या अहवालानुसार १६ ठिकाणी युवक प्रतिष्ठानने कांदळवन तसेच सीआरझेड व बफर झोन क्षेत्रात शौचालयांची बांधकामे केली असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे.

- Advertisement -

दरम्यान, याप्रकरणी आमदार प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळात आवाज उठवला होता. त्याची दखल घेत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. त्यामुळे वन विभागामार्फत शौचालये बांधण्यात आलेल्या जागेची पाहणी सुरू करण्यात आली आहे.

युवक प्रतिष्ठान यांनी सीआरझेड भागात शौचालयांचे बांधकाम केले आहे. त्याची प्रत्यक्ष पाहणी करून तो अहवाल वरिष्ठांना सादर करणार आहोत. त्यानंतर योग्य ती कारवाई होणार आहे.
– राजेंद्र मगदुम, परिमंडळ वन अधिकारी, ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -