Friday, February 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी अन्यथा मुंबईत पुन्हा लॉकडाऊन होईल – महापौर

अन्यथा मुंबईत पुन्हा लॉकडाऊन होईल – महापौर

नियमाचे पालन न केल्यास पुन्हा एकदा मुंबईत लॉकडाऊन लागू करण्याची वेळ येऊ शकते.

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या आकडेवारीत घट होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुंबईतील जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल सर्वसामान्यांकरता १ फेब्रुवारीपासून सुरु करण्यात आली आहे. तर लोकल सुरु होऊन आता १५ दिवस झाले आहेत. मात्र, आता चिंतेचीबाब समोर आली आहे. सोमवारी महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आता तरी नागरिकांनी नियमांचे पालन करावे अन्यथा मुंबईत पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करावा लागेल, असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pedanekar) यांनी दिला आहे.

काय म्हणाल्या महपौर?

- Advertisement -

‘कोरोनाच्या बाबतीत गांभीर्याने लक्ष देणे फार गरजेचे आहे. लोकांनी नियमांचे पालन करावे. तसेच लोकलमधून (Mumbai Local) प्रवास करताना प्रवासी तोंडाला मास्क न लावणे, गर्दी करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे. यामुळे कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ होत आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे अन्यथा आपल्याला पुन्हा एकदा लॉकडाऊन करावे लागेल. त्यामुळे लॉकडाऊन लागू करणे हे केवळ नागरिकांच्या हातात आहे. विशेष म्हणजे मुंबईकरांना हेच सांगणे आहे की, आपल्याला लॉकडाऊन नको आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या आकडेवारीत वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकारला नाईलाजास्तव लॉकडाऊन करावे लागेल’, अशी भीती राज्यसरकारने व्यक्त केली आहे.

डिसेंबर महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या संख्येने घट झाली होती. यामुळे सहा महिन्याभरापूर्वी देशात कोरोनाचा हॉटस्पॉट झालेली मुंबई कोरोनाच्या विळख्यातून मुक्त होत असल्याचे चित्र होते. त्याचपार्श्वभूमीवर राज्य सरकारबरोबरच पालिकेनेही काही अटी शर्थींवर निर्बंद्ध शिथिल केले. त्यानंतर फेब्रुवारीपासून सामान्य नागरिकांसाठी लोकलसेवा ठराविक वेळांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. पण नंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचे समोर येत आहे.


- Advertisement -

हेही वाचा – मुंबईकरांनो पुढील ७ दिवस महत्त्वाचे -मुंबई पालिकेचा इशारा


 

- Advertisement -