घरमुंबईउल्हासनगरच्या धुरू बार मध्ये चाकू हल्ल्यात एकजण जखमी

उल्हासनगरच्या धुरू बार मध्ये चाकू हल्ल्यात एकजण जखमी

Subscribe

"धुरू" या ऑर्केस्ट्रा बार मध्ये मंगळवार १२ रात्री दोन गटात वाद होऊन हाणामारी आणि चाकू हल्ला झाला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तिन जणां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

उल्हासनगर दोनच्या नेहरु चौक परिसरात ” धुरू ” ऑर्केस्ट्रा बार आहे. या बारमध्ये मंगळवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास नवीन टेकचंदानी आणि त्याचा मित्र समीर तुलसानी हे बारमधून बाहेर पडत असताना, बारच्या जिन्यात जय आलमचंदानी आणि त्याचे तीन मित्र त्यांच्याशी पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेऊन वाद करु लागले . हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी जय आणि त्याच्या मित्रांनी नवीन आणि समीरला शिवीगाळ करुन ठोशा-बुक्क्यांनी मारहाण केली. नंतर जयने समीरच्या पोटावर आणि खांद्यावर चाकूने वार केले. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात आरोपी जय आलमचंदानी आणि त्याच्या ३ मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.

यापूर्वी देखील झाली होती हत्या

यापूर्वी धुरू बार मध्ये एका व्यापाऱ्याची हत्या करण्यात आली होती, काही वर्षांपूर्वी राजेश कुकरेजा या तरुणाची हत्या देखील याच बार मध्ये हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एका विद्यमान नगरसेवक सहित काही राजकीय नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र नंतर पुराव्या अभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली . या बार मध्ये अश्लील नृत्ये करणाऱ्या बारबाला यांच्या विरुद्ध देखील अनेकदा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या वादांमुळे गेली कित्येक वर्षे हा बार बंद होता मात्र पोलीस प्रशासनाने पुन्हा बारला परवानगी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -