घरमुंबईराणी बागेतील लक्ष्मी हत्तीणीचा मृत्यू

राणी बागेतील लक्ष्मी हत्तीणीचा मृत्यू

Subscribe

राणी बागेतील ‘लक्ष्मी’ या हत्तीणीचा (६४) वृद्धापकाळाने नुकताच मृत्यू झाला आहे. तिची हालचाल मंदावली होती. तिने खाणेपिणे कमी केले होते. प्राणी संग्रहालय प्रशासनाने तिला वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले मात्र अखेर तिचा मृत्यू झाला. तिला राणी बागेतील जागेतच दफन करण्यात आले आहे. यासंदर्भांतील माहिती प्राणी संग्रहालयातील प्रमुख अधिकारी डॉ. त्रिपाठी यांनी दिली.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने खासगी कंपन्या आदी बंद झाल्या होत्या. केंद्र सरकारच्या आदेशाने देशात लॉकडाऊन सुरू करण्यात आला होता. त्यामुळे भायखळा येथील राणी बाग प्राणिसंग्रहालयही बंद करण्यात आले. आजही राणी बाग पर्यटकांसाठी बंद आहे. त्यामुळे राणी बागेच्या उत्पन्नावरही परिणाम झाला होता. मात्र प्राण्यांची देखभाल व्यवस्थित केली जात असल्याचे समजते. राणीच्या बागेत १९७७ ला ‘लक्ष्मी’ नावाची हत्तीण बिहार येथून प्राणीसंग्रहालयात आणण्यात आली होती. तिने जवळजवळ ४३ वर्षे राणी बागेत वास्तव्य केले. मात्र गेल्या काही दिवसांपासून तिची प्रकृती खालावल्याने तिने अन्नपाणी कमी केले होते. तिच्यावर शेवटच्या क्षणापर्यंत उपचार सुरू होते. मात्र अखेर गुरुवारी तिचा मृत्यू झाला.

- Advertisement -

लक्ष्मीच्या निधनानंतर सध्या याठिकाणी अनारकली ही एकमेव हत्तीण असून तीचे वय ५४ वर्ष आहे. नियमानुसार प्राणी संग्रहालयात हत्ती ठेवण्यास मनाई आहे. त्यामुळे आता प्राणी संग्रहालयात नवा हत्ती आणता येणार नसल्याचे डॉ. त्रिपाठी यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, जंगलातील हत्ती कमी काळ म्हणजे ४८ वर्षांपर्यंत जगतात तर प्राणीसंग्रहालयातील हत्ती हे किमान ६५ वर्षे तर जास्तीत जास्त ८० वर्षांपर्यंत जगतात.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -