घरताज्या घडामोडीनगरसेवकांच्या वाचनालयासाठी मोठी प्रशस्त जागा

नगरसेवकांच्या वाचनालयासाठी मोठी प्रशस्त जागा

Subscribe

आयुक्तांनी दिले महापौरांना आश्वासन

नगरसेवकांच्या वाचनालयासाठी मोठी प्रशस्त जागा देणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी महापौरांना दिले. महापालिका मुख्यालयातील नवीन इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असल्याने सोमवारी प्रत्यक्ष महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी महापौरांसह जागेची पाहणी केली. यावेळी आयुक्तांनी शिवसेना पक्ष कार्यालयासह नगरसेवकांसाठी असलेल्या वाचनालयाचीही पाहणी केली. मात्र, यातील काही जुनी पुस्तके चाळतानाच, वाचनालयाची जागा प्रशस्त आणि सुसज्ज बनवण्याचा प्रयत्न केला जाईल. यासाठी सर्वतोपरी प्रशासन मदत करायला तयार असल्याची ग्वाही परदेशी यांनी दिली.


हेही वाचा – तिहेरी अपघातात ९ जण जागीच ठार


महापालिका मुख्यालयातील नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सध्या शिवसेना, राष्ट्वादी काँग्रेस, भाजप आदींची पक्ष कार्यालये असून उर्वरीत जागेमध्ये महापालिका चिटणीस व पर्यावरण उपायुक्तांचे कार्यालय आहे. मात्र, या जागेवरील चिटणीस विभागाच्या आस्थापना कक्ष आणि भाजप कार्यालयाच्या जागेवर महापौर आणि उपमहापौरांसाठी कार्यालय उभारण्यासाठी आग्रही असणार्‍या महापौरांनी सोमवारी महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्यासमवेत पाहणी केली. यापूर्वी महापौरांनी, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्यासमवेत याच जागेची पाहणी केली होती. त्यानंतर सोमवारी या जागेची पाहणी केली. महापौर आणि आयुक्तांनी दुपारी अचानक शिवसेना पक्ष कार्यालयात जावून नुतनीकरणाच्या कामाची पाहणी केली. यावेळी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व कार्यालये जुन्या इमारतीतील नवीन जागेत हलवली जात असल्याचे सांगण्यात आले. यावेळी चिटणीस यांनीही आपल्या कार्यालयासाठी ही जागा आवश्यक असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. यानंतर आयुक्तांनी चिटणीस व भूसंपादन अधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांना किती जागा आवश्यक आहे याची माहिती घ्यावी आणि त्यानुसार दोघांच्या स्वाक्षरी घेतली जावी, अशा सूचना केल्या.

- Advertisement -

मात्र, आधी याच मजल्यावर आपल्या कार्यालयाचा अट्टाहास धरणार्‍या महापौरांनी, जुन्या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावरील जागेकडे बोट दाखवले आहे. सध्या भू संपादन अधिकारी व विकास नियोजन आराखड्याचे काम पाहणार्‍या सल्लागारांची कार्यालय असलेल्या जागेत महापौरांसह उपमहापौरांच कार्यालये बनवली जावी. तसेच भूसंपादन अधिकार्‍यांचे कार्यालय अन्य ठिकाणी हलवली जावी, अशी सूचना महापौरांनी केली. यावर आयुक्तांनी ही शक्यता पडताळून पाहिली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

मात्र, ही पाहणी करून गेल्यानंतर, आयुक्त व महापौर यांनी नगरसेवकांच्या वाचनालयाला भेट दिली. यावेळी आयुक्तांनी, येथील काही जुनी पुस्तके चाळण्याचा प्रयत्न केला. यातील काही पुस्तके पाहून त्यांना काही ओळी वाचण्याचा मोहही आवरला नाही. त्यामुळे कपाटातील पुस्तकांची रचना पाहून त्यांनी विभागातील कर्मचार्‍यांची प्रशंसाही केली. परंतु ही जागा नगरसेवकांसाठी अपुरी असल्याने यासाठी मोठी जागा असणे आवश्यक असल्याचे सांगत आपण यासाठी मोठी जागा देवू असेही आश्वासित केले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -