घरमुंबईठाण्याच्या फुलपाखरु उद्यानात बिबट्याचे दर्शन

ठाण्याच्या फुलपाखरु उद्यानात बिबट्याचे दर्शन

Subscribe

ठाण्यातील मानपाडा येथील वन विभागाच्या फुलपाखरु उद्यानात नागरिकांनी आज बिबट्याचे दर्शन केले.

शहरात बिबट्याने धुमाकूळ घातल्याच्या घटना दिवसेंदिवस घडत असताना आज पुन्हा एकदा ठाण्यातील मानपाडा येथील एका उद्यानात सकाळी बिबट्याचे दर्शन झाले आहे. बिबट्याला पाहून संपूर्ण परिसरात घबराट उडाली होती. मात्र, काही वेळातच हा बिबट्या स्वत:हून निघून गेल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

ठाण्यातील मानपाडा येथील वन विभाग

ठाण्यातील ठाण्यातील मानपाडा येथील वन विभागाच्या फुलपाखरु उद्यानात नागरिकांनी आज बिबट्याचे दर्शन केले. नागरिकांनी आज बिबट्याचे दर्शन केले. या दरम्यान, मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या लोकांनी बिबट्याला पाहून एकच आरडाओरड केली. तसेच लोकांची गर्दी पाहून बिबट्या जागीच थांबला होता. ही बाब वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच खबरदारी म्हणून त्यांनी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांना बाहेर काढले आणि त्यानंतर बचावपथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, बचाव पथक येण्यापूर्वीच बिबट्या तारेच्या कुंपणावरुन उडी मारुन निघून गेला असल्याचे एका प्रत्यक्षदर्शीनी सांगितले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – शहरापाठोपाठ गावठाणांमध्येही बिबट्याचा मुक्त संचार; गावकऱ्यांमध्ये दहशत

हेही पहा – VIDEO: नाशिकमध्ये बिबट्याचा थरार; ७ तासानंतर बिबट्या जेरबंद

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -