घरमुंबईराज ठाकरेंच्या सभेला मुंबईत परवानगी

राज ठाकरेंच्या सभेला मुंबईत परवानगी

Subscribe

'लाव रे तो व्हिडिओ'...असा आदेश देणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेला मुंबईत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरेंचा 'लाव रे तो व्हिडिओ'चा धुमाकूळ पाहायला मिळणार आहे.

‘लाव रे तो व्हिडिओ’ या एका वाक्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गुगल असो की फेसबुक सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ या एकाच वाक्याची चर्चा आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाला राज ठाकरेंच्या या एका वाक्याने अक्षरशः धडकी भरली आहे. राज ठाकरे यांनी राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अमित शहा यांच्याविरोधात रान उठवल्यानंतर भाजपच्या गोटात खळबळ माजू लागली आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढल्यानंतर मुंबईतही सरकारचा पर्दाफाश करण्याची तयारी केली आहे. परंतु मुंबईतील राज ठाकरे यांच्या सभेला महापालिका तसेच निवडणूक अधिकार्‍यांकडून टोलवाटोलवी केली जात होती. मनसे निवडणूक लढवत नसल्याचे कारण देत सभेला परवानगी नाकारली होती. परंतु, आता राज ठाकरे यांच्या सभेला २४ तारखेऐवजी २३ तारखेला परवानगी देण्यात आली आहे.

राज ठाकरेंच्या येथे झाल्या सभा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ने आतापर्यंत नांदेड, सोलापूर, इचलकरंजी, सातारा, पुणे आणि महाड येथे अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. राज्यातील शेवटच्या टप्प्याचं मतदान २९ एप्रिल रोजी होत असून त्यापूर्वी आणखी तीन ते चार सभा राज ठाकरे घेण्याची शक्यता दिसून येत आहे.

- Advertisement -

निवडणूक विषयक सर्व प्रकारच्या सभा, प्रचारसभा यासाठीच्या रीतसर परवानग्या या कार्यालयातील एक खिडकी योजना अंतर्गत दिल्या जातात. त्यामध्ये सर्वच पक्ष अपक्षांचा समावेश असतो. नियमानुसार या परवानग्या दिल्या जातात. त्यामुळे कोठेही पक्षपाती पणा केला जात नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील या ठिकाणी परवानगी मागितली होती. त्यांनाही आज नियमाप्रमाणे परवानगी देण्यात आली आहे. तसेच अन्य पक्षाचेही अर्ज आले असून त्याचाही नियमानुसार विचार केला जात आहे. याबाबत होत असलेल्या अपप्रचाराबाबत हा खुलासा, हे स्पष्टीकरण देण्यात येत आहे.

२३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान

येत्या २३ एप्रिला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. हे मतदान जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.

- Advertisement -

वाचा – ‘लाव रे तो व्हिडिओ’मुळे भाजपा सैरभैर; सोशल मीडिया टीमवर आला ताण

वाचा – ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या मागचे कलाकार; मुंबईच्या डिजिटल रथ राज्याव्यापी दौऱ्यावर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -