घरमुंबईउदयन राजेंच्या विरोधात नरेंद्र पाटील; शिवसेना देणार तिकीट

उदयन राजेंच्या विरोधात नरेंद्र पाटील; शिवसेना देणार तिकीट

Subscribe

नरेंद्र पाटील यांना सातारा लोकसभा मतदार संघाची उमेदवारी शिवसेना पक्षाकडून मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आज ते उध्दव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

साताऱ्यामधून उदयनराजे भोसले यांच्या विरोधात आता राष्ट्रवादीचे माजी आमदार नरेंद्र पाटील उभे राहणार हे जवळपास निश्चित झाले असून, शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. कोल्हापूर येथे युतीची पहिली जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून, यावेळी नरेंद्र पाटील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. नरेंद्र पाटील आज दुपारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

कोण आहेत नरेंद्र पाटील

नरेंद्र पाटील हे माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र आहेत. सातारा, वाई, कोरेगाव, पाटण इथे माथाडी मतदारांवर नरेंद्र पाटील यांची पकड आहे. मराठा मोर्चे निघाला होते, त्यात सातारा पट्ट्यातील लोकांचा सर्वाधिक समावेश होता. तसेच राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकासमंडळाचं अध्यक्षपद दिल्यानंतर नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -