घरताज्या घडामोडीअबब...! पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर गेल्या पाच वर्षांत ४४६ कोटींहून अधिक खर्च

अबब…! पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर गेल्या पाच वर्षांत ४४६ कोटींहून अधिक खर्च

Subscribe

पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यावर किती खर्च झाला, असा सवाल लोकसभेत विचारण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर गेल्या पाच वर्षांमध्ये ४४६.५२ कोटी रूपयांचा खर्च झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोदींच्या परदेश दौऱ्यांवर गेल्या पाच वर्षांमध्ये किती खर्च करण्यात आला. याबाबत लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधर यांनी लेखी उत्तराद्वारे माहिती दिली. पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांमध्ये झालेल्या खर्चांमध्ये चार्टर्ड विमानांचा खर्चही सामाविष्ट करण्यात आल्याचे सांगितले. तसेच २०१५-१६ या कालावधीत त्यांच्या परदेश दौऱ्यांवर सर्वाधिक खर्च झाला आहे. यावेळी त्यांच्या दौऱ्यांवर १२१.८५ कोटी रूपयांचा खर्च झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

गेल्या पाच वर्षांत पंतप्रधानांनी असे केले परदेश दौरे

२०१६-१७ या कालावधीत पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवर ७८.५२ कोटी रूपये खर्च झाले. २०१७-१८ मध्ये त्यांच्या परदेश दौऱ्यावर ९९.९० कोटी रूपये तर २०१८-१९ मध्ये १००.०२ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला. २०१९-२० या कालावधीत त्यांच्या दौऱ्यावर ४६.२३ कोटी रूपये खर्च झाला, अशी माहिती मुरलीधरन यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा मालदीव आणि श्रीलंकेचा दौरा केला होता. त्यानंतर त्यांचा अमेरिकेचा दौरा चर्चेचा विषय ठरला होता. यावेळी त्यांनी ह्युस्टनमध्ये हाऊडी मोदी या कार्यक्रमाला संबोधित केले होते.

- Advertisement -

एकाच प्रवासावेळी बऱ्याच देशांना भेटी

नरेंद्र मोदी हे भारतातील पहिले असे पंतप्रधान असतील, त्यांनी त्यांच्या कारकिर्दित सर्वाधिक परदेश दौरे केले आहेत. मोदींनी एकदा प्रवास सुरू केल्यावर ते बऱ्याच देशांना भेटी देऊन परत येतात, ही त्यांची खासियत आहे. २०१५ साली मोदींनी एकाच दौऱ्यामध्ये उझवेकिस्तान, कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान, किरगिझिस्तान आणि रशिया या देशांना भेटी दिल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -