घरमुंबईविद्यापीठात उभारणार लोकशाहीर पठ्ठे बापूराव कलादालन

विद्यापीठात उभारणार लोकशाहीर पठ्ठे बापूराव कलादालन

Subscribe

परंपरा महोत्सवात राज्यमंत्री वायकरांची घोषणा

मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या शाहीर अमरशेख अध्यासनात लोकशाहीर पठ्ठे बापूराव कलादालन उभारण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिले. विद्यापीठाच्या लोककला अकादमीतर्फे भरवलेल्या दोन दिवसीय परंपरा महोत्सवाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.

आदिवासी लोकनृत्य व संगीताला वाहिलेल्या या परंपरा महोत्सवात राजस्थान, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक व आंध्रप्रदेश या राज्यांतील २०० आदिवासी कलावंत सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील बोहाडा, सोंगी नाच त्याचप्रमाणे अन्य राज्यातील गैर नृत्य, थपेट गुलु, ढोलू कुनीथा, राठवा नृत्य, चक्री नृत्य असे विविध कलाप्रकार सादर केले. कालिनातील कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवन विद्यानगरीमध्ये सुरू झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात गायिका ईला अरुण उपस्थित होत्या.

- Advertisement -

मुंबई विद्यापीठाची लोककला अकादमी, शाहीर अरमशेख अध्यासन, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर, साहित्य अकादमी, डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृतू संशोधन केंद्र पुणे यांच्यातर्फे भरवलेल्या दोन दिवसीय परंपरा महोत्सवामध्ये आदिवासी साहित्यावर राष्ट्रीय चर्चासत्र झाले. यामध्ये 25 अभ्यासक सहभागी झाले होते. चर्चासत्राचे उद्घाटन ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी केले तर अध्यक्षस्थानी साहित्य अ‍ॅकॅडमीचे उपाध्यक्ष माधव कौशिक होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -