घर टेक-वेक आता गुगलच्या मदतीने ठेवा तुमच्या मुलांवर नजर

आता गुगलच्या मदतीने ठेवा तुमच्या मुलांवर नजर

Subscribe

हे अॅप अँड्राईड आणि iosयुजर्स दोघांसाठी आहे. अँड्राईड किटकॅट व्हर्जनमध्ये हे अॅप चालणार आहे.

पालकांच्या अनुपस्थितीत मुले घरी कोणालाही त्रास देऊ नये म्हणून अनेक पालक मुलांना मोबाईल फोन्स, महागडे टॅबलेट देतात. पण मुलं दिवसभर त्यावर काय करतात. इंटरनेट सुविधा दिल्यामुळे काय पाहतात ? यावर लक्ष ठेवता येत नाही. पण मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी खास पालकांसाठी गुगलने एक अॅप तयार केले आहे. या अॅपसंदर्भात आधी पासून चर्चा होती. पण हे अॅप प्रत्येक पालकाने काळाची गरज समजून डाऊनलोड करावे यासाठी गुगलच्या होमपेजवर खाली या अॅपची लिंक देण्यात आली. ज्यात पालकांना मदत करणार गुगल फॅमिली लिंक असे म्हटले आहे.

ट्विटरवर दर ३० सेकंदाला महिलांबाबत वापरले जातात अपशब्द

काय करणार हे अॅप ?

खास पालकांसाठी तयार करण्यात आलेले हे अॅप असून त्याचा वापर केवळ पालकच करु शकणार आहे. तुमच्या पाल्याच्या फोनला तुमच्या फोनमधील अॅप कनेक्ट करायचा आहे.तुमचे पाल्य मोबाईलवर किती वेळ घालवते. काय करते ? ,इंटरनेटवर काय सर्च करते हे कळू शकणार आहे. मुलांना काही गोष्टी पासून लांब ठेवण्यासाठी तुम्ही तुम्हाला नको असलेल्या साईटस ब्लॉकही करु शकता. फोनच्या स्क्रिनवरील लाईट,स्लीप टाईम, आरोग्याच्या आणि वयाच्या अनुसार फोन वापराच्या वेळा यावरही तुम्हाला नियंत्रण ठेवता येऊ शकते. शिवाय फोनचे लोकेशनही हा फोन ट्रेस करु शकते.

जरा जपून, ‘या’ पासवर्डवर हॅकर्सची नजर

कसं कराल अॅप डाऊनलोड?

- Advertisement -

हे अॅप अँड्राईड आणि iosयुजर्स दोघांसाठी आहे. अँड्राईड किटकॅट व्हर्जनमध्ये हे अॅप चालणार आहे. तेव्हा जर तुम्हाला तुमच्या मुलांचे भविष्य इंटरनेटच्या विळख्यातील काही गोष्टींपासून वाचवायचे असेल तर हे अॅप डाऊनलोड करा.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -