घरमुंबईआठवड्यात गिरणी कामगारांची लॉटरी काढा

आठवड्यात गिरणी कामगारांची लॉटरी काढा

Subscribe

गिरणी कामगारांची रखडलेल्या लॉटरीमुळे आता गिरणी कामगारांच्या असंतोषात भर पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळेच येत्या दिवसांमध्ये हक्काच्या घरांसाठी गिरणी कामगार म्हाडावर धडकणार आहेत. गिरणी कामगारांना घर तसेच गिरणी कामगारांच्या मुलांना नोकरी अशी आश्वासने मिळाली असतानाही कोणत्याच आश्वासनाची पुर्तता झाली नाही. त्यामुळेच गिरणी कामगार तरूण स्वराज संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. येत्या आठ दिवसात गिरणी कामगारांची लॉटरी काढण्यात यावी, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. येत्या आठवड्याभरात जर गिरणी कामगारांच्या घरांची लॉटरी काढली नाही तर राज्यभरातून म्हाडा मुख्यालयासमोर आंदोलन करतील असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे. गिरण्यांच्या जागेवर जो रोजगार तयार होईल त्याठिकाणी गिरणी कामगारांच्या मुलांना नोकरी देण्याचे आश्वासन आघाडी सरकारच्या काळात देण्यात आले होते. पण या आश्वासनाची पुर्तता झाली नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. म्हाडाने चौथ्या टप्प्यात ५ हजार ९० घरे देण्याचे आश्वासन दिले होते. विधानसभा निवडणुकांच्या आधीच गिरणी कामगारांची लॉटरी निघणार असे आश्वासन म्हाडा अध्यक्षांनी दिले होते. पण काही तांत्रिक अडचणींमुळे ही लॉटरी पुन्हा एकदा रखडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -