घरमुंबईमुख्यमंत्र्यांच्या कृपेने भूखंड घोटाळा - काँंग्रेस

मुख्यमंत्र्यांच्या कृपेने भूखंड घोटाळा – काँंग्रेस

Subscribe

कोयना धरण प्रकल्पग्रस्तांना नवी मुंबई येथे मिळालेली २४ एकर जमीन कवडीमोल दराने बिल्डरला आंदण दिल्याचा आरोप काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. बाजारभावाप्रमाणे या भूखंडाची किमंत १ हजार ६०० कोटी असून केवळ ३ कोटी रुपयांना ती बिल्डरच्या घशात घातली गेली आहे. मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांची मदत आणि मुख्यमंत्र्यांच्या वरदहस्ताशिवाय हे शक्य नसल्याचा आरोप काँग्रेसतर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आला. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाल आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील उपस्थित होते.

कोयना धरण प्रकल्पग्रस्त असलेल्या आठ कुटुंबाना ही जमीन सरकारतर्फे देण्यात आली होती. नवी मुंबईतील सिडको क्षेत्रातील हा भूखंड बिल्डर मनिष भतिजा आणि संजय भालेराव यांना विकण्यात आला आहे. मे महिन्यात या जमीनीचा व्यवहार झाला असून १६०० कोटी किमंत असलेल्या या जमीनीची विक्री प्रति एकर १५ लाख रुपयांनी करण्यात आली आहे. सर्व कायदे धाब्यावर बसवत आश्चर्यकारकरित्या एका दिवसातच जमीनीच्या नावामध्ये फेरबदल करणे, पॉवर ऑफ एटर्नी नावावर करणे अशा सर्व गोष्टी एका दिवसांत पार पडलेल्या आहेत. सिडको आणि संबंधित तहसीलदार कार्यालयाने एका दिवसांत सर्व कार्यवाही कशी काय पूर्ण केली? असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे.

- Advertisement -

बिल्डर भालेरावची आमदार प्रसाद लाड यांच्याशी जवळीक

या संशयास्पद व्यवहारातील बिल्डर संजय भालेराव आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची जवळीक असल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे. तसेच लाड हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना या व्यवहाराची कल्पना असणार, असाही आरोप त्यांनी केला आहे.
या भ्रष्टाचार प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, तसेच संशयास्पद असलेला हा व्यवहार रद्दबातल करावा, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -