घरमुंबईराज्यात मृतांची संख्या २०७ वर , ११ जण अद्यापही बेपत्ता

राज्यात मृतांची संख्या २०७ वर , ११ जण अद्यापही बेपत्ता

Subscribe

राज्यात दरड कोसळून आणि पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या मंगळवारी २०७ झाली. रायगड जिल्ह्यात सुमारे १०० जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही ११ जण बेपत्ता असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे.

गेल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे रायगड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रात पूर आला. तसेच अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या. मुसळधार पाऊस, पूर आणि दरड कोसळल्यामुळे २०७ जणांना आपले प्राण गमवावे लागले असताना रायगड जिल्ह्यात सर्वाधिक ९५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल सातारा जिल्ह्यात ४५, रत्नागिरीत ३५, ठाणे १२, कोल्हापूर ७, मुंबई उपनगरात ४, पुणे ३ तसेच सिंधुदुर्ग, वर्धा, अकोला जिल्ह्यात प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

११ लोक अद्यापही बेपत्ता असून ५१ जण जखमी झाले आहेत. त्यांच्या राज्यातील विविध सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये इलाज सुरू आहेत. रायगड, सातारा, रत्नागिरीत दरडी कोसळल्यामुळे तर कोल्हापूर आणि सांगलीत पुरामुळे मृत्यू झाले आहेत. राज्यात १ जूनपासून पाऊस संबंधित दुर्घटनांमध्ये आतापर्यंत २९४ जण मृत्युमुखी पडले आहेत. पुरामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २९,१०० पाळीव प्राण्यांचा बळी गेला आहे. आतापर्यंत ३ लाख ७५ हजार १७८ जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून त्यात सांगली जिल्ह्यातील २ लाख ६ हजार ६१९ जणांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -