घरमुंबईलस नसलेल्या आणखी एका संसर्गाचा महाराष्ट्रासाठी अलर्ट !

लस नसलेल्या आणखी एका संसर्गाचा महाराष्ट्रासाठी अलर्ट !

Subscribe

महाराष्ट्रात कॉंगोच्या तापाचा धोका पाहता पालघर प्रशासनामार्फत अलर्ट देण्यात आला आहे. Crimean Congo Hemorrhagic Fever (CCHF) सर्वांना कॉंगो फिव्हर म्हणून परिचित आहे. माणसांमध्ये या रोगाचा प्रसार पाहता पालघर प्रशासनाकडून याबाबतचा अलर्ट देण्यात आला आहे. सध्याचा कोरोनाचा कहर पाहता विशेष काळजी घेण्याची मागणी पालघर प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. पशुसंवर्धन, मटण विक्रेते, कुक्कुट पालन यासारख्या व्यवसायात जास्त दक्षता घेण्याची गरज आहे असे प्रशासनाकडून कळविण्यात आली आहे.

सध्या कॉंगोच्या तापासाठी कोणताच उपचार नसल्याने जास्त दक्षता घेण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे. पालघरच्या कुक्कुटपालन विभागाचे उायुक्त डॉ प्रशांत कांबळे यांनी एक परिपत्रक काढत स्पष्ट केले आहे की, गुजरातच्या काही जिल्ह्यात हा संसर्ग पसरत आहे. तसेच सीमा भागात हा संसर्ग पसरत असल्याने महाराष्ट्रालाही याचा धोका सांगण्यात आला आहे. गुजरातच्या वलसाड जिल्ह्याच्या नजीक महाराष्ट्रातील पालघर जिल्हा आहे. त्यामुळेच विभागामार्फत महाराष्ट्रात अतिदक्षता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना घेण्याचा आदेश देण्यात आला आहे.

- Advertisement -

कॉंगो हा व्हायरल स्वरूपाचा संसर्ग आहे. एका प्राण्यापासून तो माणसांना लागण होण्याचा धोका असतो. महत्वाचे म्हणजे कॉंगोचा संसर्ग झालेल्या प्राण्याचे मटण खाल्यानंतर याचा संसर्ग होण्याचा धोका असतो. जर या संसर्गावर वेळेत उपचार न झाल्यास ३० टक्के रूग्ण मृत्यूमुखी पडू शकतात. जगभरात या आजारामुळे १० टक्के ते ४० टक्के रूग्ण दगावल्याचा टक्का जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केला आहे. सद्यस्थितीला माणसांसाठी तसेच प्राण्यांसाठी या आजाराबाबत कोणतीही लस उपलब्ध नाही. एका माणसापासून दुसऱ्या माणसालाही याचा संसर्ग होऊ शकतो. एका माणसाच्या रक्तापासून, अवयवापासून, शरीरातील द्रव्य यासारख्या माध्यमातून संसर्ग होण्याची शक्यता आहे. हॉस्पिटलच्या उपकरणातूनही हा संसर्ग होऊ शकतो. त्यामध्ये स्टरलायजेशन, वैद्यकीय उपकरणे, निडल्सचा वापर आणि वैद्यकीय पुरवठ्यातील वस्तुंचा संसर्ग आदी माध्यमातूनही याचा संसर्ग होत असल्याचे डब्ल्यूएचओ यांनी सांगितले.


 

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -