घरमुंबईराज्यात अंदाधुंद कारभार सुरु, दरेकरांचा आमदाराविरोधात गौप्यस्फोट

राज्यात अंदाधुंद कारभार सुरु, दरेकरांचा आमदाराविरोधात गौप्यस्फोट

Subscribe

मुलाला मारण्याचा प्रयत्न

विधानपरिषद अधिवेशनाच्या कामकाजाचा आज (बुधवारी,३ मार्च) तिसरा दिवस आहे. सकाळी अधिवेशनपूर्वी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाराष्ट्र सरकारमधील आमदाराबाबत गौप्यस्फोट करणार असल्याचे सांगितले होते. यावर भाष्य करताना विरोधी पक्षनेते दरेकर यांनी नाव न घेता म्हटले आहे की, एक मुलगा आपल्या पित्याच्या शोधात आहे. त्याला गायब करण्यात आले. मारण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच तो मुलगा पित्याच्या शोधात व्यसनाच्या आहारी गेला असल्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. तसेच पूजा चव्हाण प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्विकारला आहे. परंतु तो राज्यपालांकडे देण्यात आला नाही असेही प्रवीण दरेकरांनी म्हटले आहे.

दरेकरांचा आमदाराविरोधात गौप्यस्फोट

राज नावाचा मुलगा गेली अनेक वर्षांपासून आपल्या वडिलांच्या शोधात आहे. या मुलाने आणि त्याच्या आईने एका लोकप्रतिनिधीची डीएनए टेस्ट करण्याची मागणी करणारे पेटीशनही दाखल करण्यात आली आहे. राज्यात चालले अंधाधुंद कारभार सुरु आहे. या मुलाने पोलीस स्टेशनध्ये तक्रारही दाखल झाली आहे. ही तक्रार ट्रान्सफर करण्यात आली आहे. मुलगा बापाच्या शोधात असून व्यसनाच्या आहारी गेला आहे. त्या मुलाला लोकप्रतिनिधींनी बोलवले आणि डांबून ठेवले त्यामुळे दरेकरांनी सभापतींकडे संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

न्यायालयात पेटीशन दाखल केले असल्यामुळे मुलाचे नर्सकडून रक्त तपासणी करण्यात आली. यानंतर त्या मुलाला गायब करण्यात आले. मुलगा गायब झाल्याने त्याचा शोध सुरु केला तेव्हा अशी धक्कादायक माहिती समोर आली की मुलाला सुरतला ठेवण्यात आले. नंतर त्याला मारण्याचा प्रयत्न करण्यातही आला असल्याचे त्या मुलाने सांगितले असल्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. मुलाचा पत्ता लागल्यानंतर मी स्वतः महाराष्ट्रातील पोलिसांना कळवले आणि त्या मुलाचा शोध घेण्यास सुरु केला त्यानंतर त्या मुलाला मुंबईत आणले गेले. गणेशपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली परंतु तिथेही तक्रार घेण्यात आली नाही. पैशाच्या जोरावर आणि सत्तेच्या जोरावर ही मस्ती सुरु असल्याचेही विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

संबंधित लोकप्रतिनिधीचा सहकारी गणेश नायडूने मुंबईतील मोठा सरकारी भूखंड बळकावला आहे. त्याने खादी ग्राम उद्योगचे १५ -१६ एकरची आणि हजारो करोडोचे रुपयाचे शासनाचे रेव्हेन्यूचा भूखंड हडपला आहे. हे लोक अशा प्रकरे जागा हडपणार, पैसे कमवणार आणि नंतर सत्ता पैशाच्या जोरावर इथे स्वैराचार्य करणार असा अंदाधूंद कारभार सुरु आहे. ही प्रवृत्ती थांबवण्यासाठी हा भूखंड ताब्यात घ्यायला पाहिजे. याच भूखंडावर हे लोकं गरबा भरवणार आणि कोट्यावधी रुपये कमावणार हे थांबायला पाहिजे असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -