Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 'त्या' भाजपच्या नेत्याचा राजीनामा

अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ‘त्या’ भाजपच्या नेत्याचा राजीनामा

Related Story

- Advertisement -

सध्या एका भाजप नेत्याचा अश्लील व्हिडिओमुळे अधिक चर्चा होत आहे. या नेत्याचे नाव रमेश जारकीहोळी असून त्यांच्याकडे बेळगावचे पालकमंत्री आणि कर्नाटकचे जलसंपदामंत्री हे पद आहे. कर्नाटक राज्यात त्यांचे मोठे नाव आहे. पण एका अश्लील व्हिडिओ क्लिप्सप्रकरणामध्ये रमेश जारकीहोळी याचे नाव समोर आले. एका तरुणीसोबतचा त्यांच्या अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता पक्षाची बदनामी होऊ नये याकरता रमेश जारकीहोळी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे रमेश जारकीहोळी यांच्यावर आरोप?

- Advertisement -

रमेश जारकिहोळी यांच्यावर तरुणीला नोकरीच्या निमित्ताने फसवणूक करून तिच्याशी जवळीक साधून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नागरी हक्क संघर्ष समितीने अध्यक्ष दिनेश कलहळ्ळी यांनी हे आरोप लावले आहेत. तरुणीसोबत अश्लील व्हिडिओ समोर आल्यानंतर रमेश जारकीहोळी म्हणाले होते की, ‘व्हायरल झालेल्या व्हिडिओची चौकशी होऊ द्या. या प्रकरणात चूक असेल तर मला फाशी द्या.’

यामुळे जारकीहोळी यांनी तातडीने दिला राजीनामा

नुकतीच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. या पाच राज्यांमध्ये दक्षिणेतील तीन राज्यांचा समावेश आहे. त्यामुळे जारकीहोळी यांच्या याप्रकरणात फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. त्यामुळे कर्नाटक मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना तातडीने जारकीहोळी यांचा राजीनामा घेण्याचे आदेश दिला आहे. माहितीनुसार लवकरच यासंदर्भात जारकीहोळी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट करणार आहे.


- Advertisement -

हेही वाचा – आणखी एका नेत्याचे अश्लील व्हिडिओ व्हायरल


 

- Advertisement -