घरमुंबईनानाच्या मदतीला धावून आले गृहराज्यमंत्री

नानाच्या मदतीला धावून आले गृहराज्यमंत्री

Subscribe

नाना पाटेकर यांच्यावर तनुश्री दत्त यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. हे प्रकरण सध्या खूप चर्चेमध्ये आहे. राज्याचे गृहराज्य मंत्री दिपक केसरकर आता नानांच्या मदतीला धावून आले आहेत.

तनुश्री दत्ता आणि नाने पाटेकर प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. तनुश्रीने नानांवर जोरदार आरोप केलेत. मराठमोळ्या नानांच्या मदतीला आता राज्याचे गृहराज्यमंत्री दिपक केसरकर धावून आले आहेत. त्यांनी नानांची बाजू घेत तनुश्रीच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तनुश्रीच्या आरोपांमध्ये तथ्य असल्यास तिने थेट एफआयआर दाखल करावी, असे दीपक केरसकर यांनी सांगितले आहे.

काय म्हणालेत केसरकर

तनुश्री दत्ताकडे काही ठोस पुरावे असल्यास तिने ते सादर करावेत आणि एफआयआर दाखल करावी. आणि तसे केल्यास चौकशीचे आदेश दिले जातील. कायदा हा सर्वांसाठी सारखाच असतो. नाना दोषी असतील तर, त्यांना माफ केले जाणार नाही. मात्र तनुश्री कायद्याचा आधार न घेता मीडियामध्ये बेताल वक्तव्य करत असल्याचे सांगत त्यांनी तनुश्रीच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. तसेच नाना पाटेकर यांना अनेक वर्षांपासून मी ओळखतो. दुष्काळग्रस्त शेतकरी आणि आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबीयांसाठी त्यांनी केलेले काम मोठे आहे. चित्रपटांपेक्षा त्यांच्या समाजकार्यामुळे ते जास्त प्रसिद्ध आहेत. या प्रकरणामुळं नानांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असून, असे आरोप करण्याआधी विचार करायला हवा’  असे केसरकर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -