घरक्राइमबोरिवली स्थानकात तरुणीचा विनयभंग; रेल्वे पोलिसांकडून भजन गायकाला अटक

बोरिवली स्थानकात तरुणीचा विनयभंग; रेल्वे पोलिसांकडून भजन गायकाला अटक

Subscribe

बोरिवली रेल्वे स्थानकात परिक्षेला जाण्यासाठी उभ्या असलेल्या तरुणीचा विनभंग केल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी भजन गायक दीपक पुजारी याला विरार येथून अटक केली आहे.

मुंबईतील बोरिवली स्थानकात उभ्या असणाऱ्या तरुणीचा विनयभंग करणाऱ्या भजन गायकाला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी विरारमधून या आरोपीला अटक केली आहे. तरुणीने या प्रकरणाची कुटुंबीयांसोबत बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु होता. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत घटनेला 24 तास उलटत नाहीत, तोच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

बोरिवली रेल्वे स्थानकात परिक्षेला जाण्यासाठी उभ्या असलेल्या तरुणीचा विनभंग केल्याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी भजन गायक दीपक पुजारी याला विरार येथून अटक केली आहे.

- Advertisement -

आरोपी मुळचा गुजरातचा

समोर आलेल्या माहितीनुसार, 26 मार्च सकाळी 6 च्या सुमारास 19 वर्षीय विद्यार्थीनी परीक्षेला जाण्यासाठी बोरिवली रेल्वे स्थानकात लोकलची वाट पाहत एका बेंचवर बसली होती. त्यावेळी आरोपी हा तिच्या बाजूला बसला आणि त्याने तिच्या कंबरेत हात घातला. या घटनेने घाबरलेल्या तरुणीने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तर आरोपी तरुणाने तिचा पाठलाग करत तिला फलाटावर मागून मिठी मारुन विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर आरोपीने पळ काढला. मात्र, अचानक घडलेल्या या घटनेमुले तरुणी गांगरुन गेली. मात्र, परीक्षा असल्यामुळे ती परीक्षा केंद्रावर गेली.

पेपर दिल्यानंतर विद्यार्थीनिने आपल्या कुटुंबियांसह बोरिवली लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर बोरिवली लोहमार्ग पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला. तपासादरम्यान, सीसीटीव्हीच्या मदतीने मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीला विरार परिसरातून अटक केली आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: गडकरींनी शेअर केलेला मुंबई- गोवा महामार्गाचा ड्रोन व्ह्यू पाहिला? कोकणवासीयांसाठी केली मोठी घोषणा )

आरोपी हा विविध धार्मिक कार्यक्रमात धार्मिक गीते, भजन गाण्याचा व्यवसाय करत असल्याची माहिती आहे. आरोपी हा मूळचा गुजरात येथील असून तो सध्या विरारमध्ये वास्तव्यास होता. आरोपीला न्यायालयनी कोठडीत ठेवण्यात आले आहे. दारुच्या नशेत हे कृत्य केल्याची कबूली आरोपीने दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास बोरिवली पोलिसांकडून सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -