घरमुंबईनिकाल वेळेपूर्वी देण्यार्‍या शिक्षकांना बोर्डाचा ठेंगा !

निकाल वेळेपूर्वी देण्यार्‍या शिक्षकांना बोर्डाचा ठेंगा !

Subscribe

राज्य शिक्षण मंडळातर्फे यंदा दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल वेळेपूर्वीच जाहीर करुन राज्यभरातील विद्यार्थी पालकांना दिलासा दिला. मात्र निकाल वेळेवर लावणार्‍या या शिक्षकांकडे बोर्डाने पूर्णत: दुर्लक्ष केले आहे.

राज्य शिक्षण मंडळातर्फे यंदा दहावी आणि बारावी बोर्डाचा निकाल वेळेपूर्वीच जाहीर करुन राज्यभरातील विद्यार्थी पालकांना दिलासा दिला. मात्र निकाल वेळेवर लावणार्‍या या शिक्षकांकडे बोर्डाने पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. महिना उलटला तरी मुंबईतील शिक्षकांना या पेपर तपासणीचे मानधन मिळालेले नाही. बोर्डाच्या या भूमिकेमुळे शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे आता मानधनाच्या मुद्यावरुन नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

राज्य शिक्षण मंडळातील दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेवर यंदा पेपर तपासणीच्या बहिष्काराचे सावट होते. परीक्षा झाल्यानंतर ही अनेक दिवस पेपर तपासणीवर बहिष्कार कायम असल्याने यंदा निकाल उशीराने जाहीर होतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र त्यातनंतरही राज्यातील विशेषत: मुंबईतील शिक्षकांनी निकालाच्या कामात विशेष लक्ष घालून यंदा वेळेपूर्वी निकाल जाहीर करुन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला. विशेष करुन यात मुंबईतील शिक्षकांचे कौतुक करण्यात आले. राज्यातील नऊ विभागीय मंडळात मुंबईतील सर्वाधिक विद्यार्थी आहेत. मात्र निकालाचे काम वेळेत पूर्ण करणार्‍या शिक्षकांना अद्याप त्यांचे मानधन मिळालेले नाही. परीक्षकांसह मॉडरेशन पूर्ण करणार्‍या शिक्षकांनाही अद्याप मानधन मिळालेले नाही. याबाबत शिक्षकांनी बोर्डाकडे संपर्क साधला तरी त्यांची दखल घेण्यात आलेली नाही.

- Advertisement -

यासंदर्भात बोलताना टीचर्स डेमोक्रेटिक फंड (टीडीएफ) शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष राजेश पंड्या म्हणाले की, गेल्या दोन वर्षापासून बोर्डाकडून आरटीजीएसमार्फत मानधन दिले जाते. तेव्हापासून हा गोंधळ होत आहेत. या अगोदर कधीही मानधन उशिरा मिळाले नव्हते. मात्र गेल्यावर्षीपासून हा गोंधळ सुरु झाला आहे. परीक्षकांसह मॉडरेटरलादेखील अद्याप पैसे मिळालेले नाहीत. यंदा निकालाचे काम वेळेत पूर्ण केले. तरी अशाप्रकारे मानधन वेळेत मिळत नसेल तर हे दुर्भाग्यपूर्ण आहे, असा आरोप पंड्या यांनी केला आहे.

फेरपरीक्षा आणि पुनर्मूल्यांकनामुळे उशीर

दहावी आणि बारावी परीक्षेनंतर सध्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करतात. त्याचबरोबर गेल्या वर्षीपासून नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून जुलैमध्ये फेरपरीक्षा घेण्यात येते. या तयारीत बोर्ड व्यस्त असल्याने शिक्षकांच्या मानधनाचा प्रश्न निकाली काढण्यास उशीर होत आहे, अशी माहिती सूत्रांकडून हाती आली आहे.

- Advertisement -

पेपर तपासनिकांचे आणि मॉडेरटर्सच्या मानधनाची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. लवकरच त्यांना पैसे मिळतील. फक्त बारावीच्या काही पेपर तपासनिसांचे बिल बाकी आहेत. तेदेखील अंतिम टप्प्यात असून लवकर त्यांना मानधन मिळेल. येत्या आठवड्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहेत.                                                                              – डॉ. सुभाष बोरसे, सचिव, मुंबई विभागीय शिक्षण मंडळ.

 

काय आहे मानधनाचे गणित

     पेपर         दहावी – बारावी
३ तासाचा पेपर – ५ रुपये – ६ रुपये
२.५ तासाचा पेपर -४ रुपये – ५ रुपये
२ तासाचा पेपर – ३ रुपये – ३ रुपये
१ तासाचा पेपर – २ रुपये – ३ रुपये

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -