घरमुंबईजगभरातील उद्योजकांची महाराष्ट्राला पसंती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जगभरातील उद्योजकांची महाराष्ट्राला पसंती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Subscribe

मुंबईमध्ये केंद्र शासन, राज्य शासन आणि सीआयआयच्या संयुक्त विद्यमाने २५ वी भागिदारी परिषद आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात उद्योग सुरू करण्यासाठी जगभरातील उद्योजकांनी पसंती दिली असून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य हे उद्योग क्षेत्रात आघाडीवर असून येथे सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. म्हणूनच जगभरातील उद्योजकांनी महाराष्ट्रात आर्थिक गुंतवणूक करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ते रविवारी येथील जे. डब्ल्यु. मेरियर हॉटेल सहारामध्ये आयोजित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय भागिदारी परिषदेत ’अ डिजिटल वायर फेम ऑल द पार्टनरशिप समिट’ या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी केंद्रिय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू उपस्थित होते.

- Advertisement -

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र राज्य हे उद्योग व्यवसायांसाठी प्रमुख ऊर्जास्त्रोत आहे. गेल्या वर्षी या राज्यात 42 टक्के तर चालू वर्षी 49 टक्के परदेशी गुंतवणूक झाली. गेल्या चार वर्षापासून ’इज ऑफ डुईंग बिजनेस’च्या माध्यमातून राज्य आघाडीवर आहे. महाराष्ट्राचा उद्योग क्षेत्रातील भागिदारीत मोठा वाटा आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यक्षमता, विश्वासार्हता आणि पारदर्शकतेच्या जोरावर महाराष्ट्राने प्रगती साधलेली आहे. प्रशिक्षित मनुष्यबळ, चांगले रस्ते, वीज आणि पाण्याची मुबलकता, पर्यावरण अनुकूलता, उद्योग सुलभता आणि डिजिटल व्यवहारामुळे देश – विदेशातील उद्योगपतींनी महाराष्ट्राला पसंती दर्शविली आहे.

महाराष्ट्र राज्य डिजिटल कनेक्टीव्हीटीने जगाशी जोडले गेले आहे. येथे ऑनलाईन सर्व्हिसेस, सायबर सुरक्षा मजबूत आहे. हजारो खेडी इंटरनेटच्या माध्यमातून जोडली आहेत. सर्वसामान्य नागरिकही डिजिटली साक्षर झाला आहे. राज्याचा कारभार फारपूर्वीच ई-गर्व्हनरच्या माध्यमातून सुरू असून डिजिटल इकॉनॉमीचा वापर देखील वाढला आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘आपले सरकार’ सेवा केंद्र सुरू आहे. लाखो लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे. तसेच अलीकडेच राज्यात सेवा हमी कायदाही लागू केला आहे. त्यामुळे प्रत्येकाला वेळेत सेवा मिळत आहे. शेकडो सेवा या कायद्यांतर्गत दिल्या जातात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -