घरमुंबईटॅक्स चुकवणाऱ्याचा बंगला विकत घेणाऱ्याला अटक

टॅक्स चुकवणाऱ्याचा बंगला विकत घेणाऱ्याला अटक

Subscribe

गोराई परिसरातील एक बंगला विकत घेतल्यामुळे ग्राहकाला अटक करण्यात आले आहे. या बंगल्यावर पाच कोटींचा कर असल्यामुळे ही अटक करण्यात आली.

मुंबईत रोज फसवणूकीच्या गोष्टी समोर येत असतात. या घटनांमध्ये अजून एक घटना सामिल झाली आहे. गोराई परिसरात एक बंगला विकत घेतल्यामुळे नवीन मालकाला अटक झाली आहे. या बंगल्यावर ५ कोटीहून अधिक कर असल्याची बाब घर घेतांना याच्यापासून लपवण्यात आले होते. राम गुप्ता असे अटक आरोपीचे नाव आहे. अटकेनंतर त्याला न्यायालया समोर उभे केले असता त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. यापूर्वी पोलिसांनी व्यापारी चीमन पटेल याला ही जागा विकण्याच्या गुन्हा अंतर्गत अटक केले होते. या बंगल्यावर असलेले कर्जा संबधीची माहिती लपवून कमी किमतीत हा बंगला गुप्ताला विकण्यात आला असल्याची माहिती मुंबई आयकर विभागाचे मुख्य आयुक्त ए शंकर यांनी ही माहिती दिली आहे.

आयकर विभागाने बजावली होती नोटीस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्ताला अटक करण्यात आल्यानतंर पटेल आयकर विभागाच्या कार्यालयात उपस्थित होते. पटेलवर आयकर विभागाची नजर होती. २००९ आणि २०१३ मध्ये त्याला नोटीसही पाठवण्यात आली होती. पटेल हा खोट्या आयकर पावत्या आणि इतर संबधीत कागदपत्रे बनवत असल्याचा संक्षय आयकर विभागाला होता. पटेल याच्या खात्यात असलेल्या पैशाचा हिशोब नसल्यामुळे त्याची चौकशी होत होती. पटेलवर थकीत असलेल्या कराची रक्कम ५.५ कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. ही थकीत रक्कम बंगल्याचा लिलाव करून पूर्ण करण्याची असल्याचे आयकर विभागाला अधिकार मिळणार होते. मात्र त्यापूर्वीच पटेलने हा बंगला गुप्ताला विकला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -