घरमुंबईमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई बंद!

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई बंद!

Subscribe

मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यभरामध्ये आंदोलन सुरु आहे. आज मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, रायगड,पालघरमध्ये बंदची हाक देण्याता आली आहे. मंगळवारी मुंबईत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीची बैठक झाली या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यभरामध्ये गेल्या चार ते पाच दिवसापासून आंदोलन सुरु आहे. औरंगाबादमध्ये जलसमाधी आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीमध्ये उडी मारली. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काकासाहेब शिंदेच्या मृत्यूमुळे या आंदोलनाला हिंसक वळण आले. याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाने आज मुंबई बंदची हाक दिली आहे.

मुंबई बंदची हाक

आज  मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड बंदची हाक देण्यात आली आहे. मंगळवारी मुंबईमध्ये दादरच्या राजर्षी शाहू सभागृहात मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीची यासंदर्भात बैठक झाली. कोणताही अनुचित प्रकार घडणार नसल्याचा निर्णय या बैठकित घेण्यात आला आहे. तसंच मुंबईमध्ये एकही सायकल चालू देणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा, दूध दुकानं, शाळा, कॉलेज, स्कूल बस सूरु राहणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विरेंद्र पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांविरोधात कार्यकर्ते नाराज

गेल्या दोन वर्षापासून मराठा समाज आपल्या मागणीसाठी शांततेत आंदोलन करत आहे. मात्र सरकारने कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे या मुख्यमंत्र्यांविरोधात कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे मुंबईसह नवी मुंबई, पालघर, रायगड, ठाणे येथे उत्स्फूर्त बंद ठेवण्यात येणार आहे. बंदच्या काळात कोणालाही त्रास होणार नाही, याची कार्यकत्यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन पवार यांनी केले.

एपीएसमी मार्केट राहणार बंद

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट पूर्णपणे बंद असणार आहे. वाशीतील माथाडी भवनामध्ये मराठा समाजाची बैठक झाली. या बैठकीमध्ये नवी मुंबई आणि पनवेल बंदची हाक देण्यात आली. या बंद दरम्यान भाजीपाला, फळ मार्केट वगळून कांदा, बटाटा, मसाला आणि धान्य मार्केट बंद राहणार आहे.

- Advertisement -

सरकारला आमच्याकडून काय अपेक्षा आहे?

कुठल्याही मोर्चात एकही दगड कोणालाही मारला नसल्याचे या बैठकी दरम्यान सांगितले आहे. सरकारला आमच्याकडून काय अपेक्षा आहे असा सवाल यावेळी करण्यात आला. चूकीची गोष्ट मराठा समाज सहन करणार नाही. कोणालाही नुकसान होणार नसल्याचे या बैकीत सांगण्यात आले. तसंच सर्वांना बंदमध्ये सहभागी होण्याचे निवेदन करण्यात आले.

मोर्चा आक्रमक झाल्यास मुख्यमंत्री जबाबदार

मराठा समाजाने आतापर्यंत शांततेत आंदोलने केली. मराठा समाजाने आतापर्यंत ५८ मुक मोर्चे शांततेत काढले. मात्र आता मराठा समाजाची सहनशीलता संपली. सरकारने फक्त फसवे आश्वासन दिले. त्यामुळे बुधवारी बंदीची हाक दिली असून गालबोट लागल्यास मुख्यमंत्री जबाबदार असेल, असे अकुंश कदम यांनी बैठकीत सांगितले.

९ ऑगस्टला आंदोलनाची दिशा ठरणार

मंगळवारी महाराष्ट्रातील काही भागात बंद पाळण्यात आला. एका कार्यकत्याला आत्मदहन करावे लागेल. सरकार ठोस निर्णय घेत नसून बुधवारचे आंदोलन शांततेत असेल. मात्र ९ ऑगस्टला तीव्र आंदोलन होईल आणि त्याला सरकार जबाबदार असेल, असे केशभाई भोसले यांनी सांगितले. तर सरकारने मेगा भरतीचे गाजर दाखवले ते त्वरित रद्द करावे, मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची माफी मागावी व राजीनामा द्यावा, अशी मागणी विरेंद्र पाटील यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -