घरमुंबईमीरा-भाईंदरमध्ये आज महापौर निवडणूक

मीरा-भाईंदरमध्ये आज महापौर निवडणूक

Subscribe

मते खेचण्यासाठी घोडेबाजाराला उत n भाजपच्या नगरसेवकाविरोधात तक्रार

मीरा-भाईंदर शहरात आज 26 तारखेला होणारी महापौरपदाची निवडणूक आता प्रतिष्ठेची झाली असून, नगरसेवकांची मते स्वतःच्या पारड्यात पाडून घेण्यासाठी घोडेबाजार सुरू झाला आहे. त्यामुळे सर्व पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. यापार्श्वभूमीवर भाजपच्या मेहता गटाचे नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांच्या विरोधात नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

21 फेब्रुवारी 2020 रोजी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नगरसेविका उमा सपार यांना व त्यांच्या कुटुंबियांना सतत फोन करून, मानसिक त्रास देत असून त्यांचे मत भाजपच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केल्याबाबत तक्रार करण्यात आली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे यांनी आपल्या लेटरहेडवर काही नगरसेवकाच्या सहीने सदर तक्रार दाखल केली आहे. काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक व नगरसेविकांना जाणारे सततचे फोन यामुळे भाजपमध्ये गट-तट पडल्याचे दिसून येत आहे. अपक्ष आमदार गीता जैन आणि माजी आमदार नरेंद्र मेहता या दोघांमध्ये नगरसेवक स्वतःकडे राखण्यासाठी रस्सीखेच सुरू झालेली असताना, शिवसेनेचे अनंत शिर्के यांना महापौर बनवण्यासाठी राज्यात राबवलेला महाविकास आघाडीचा फॉर्म्युला मीरा-भाईंदर महापालिकेतही यंदा पहायला मिळतो आहे की काय असे चित्र आता निर्माण झालें आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या 12 नगरसेवकांना महत्व प्राप्त झाले असून त्याना भाजप कडे वळवन्याचे प्रयत्न सुरु आहेत. यातूनच हा प्रकार सुरु असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

उमा सपार या सभागृहाच्या ज्येष्ठ नगरसेविका असल्याने त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी घरी गेलो होतो. त्यावेळी त्यांचा मुलगा श्रीनिवास उपस्थित होता. त्यात गैर काय? विरोधक पराभव समोर दिसत असल्याने नाहक खोटा आरोप करत आहेत.
– ध्रुवकिशोर पाटील, भाजप नगरसेवक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -