Covid-19 तिसऱ्या लाटेविरोधात मुंबई महापालिका ‘मिशन मोड’मध्ये

covid-19 center

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आलेली आहे ; मात्र लवकरच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांचनी वर्तवली आहे. त्यानुसार मुंबई महापालिका प्रशासन आपली आरोग्य यंत्रणा आतापासूनच सुसज्ज ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत कोरोनावर काही प्रमाणात नियंत्रण आल्याने यापूर्वी बंद करण्यात आलेली दहिसर, बीकेसी, दहिसर, मुलुंड इत्यादी कोविड सेंटर १२ ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून तिसरी लाट आल्यास रुग्णांवर उपचारासाठी खाटांची संख्या कमी पडू नये, यासाठी किमान २० हजार खाटांची व्यवस्था करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.

मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या कमी झाला आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. मात्र वैद्यकिय तज्ज्ञांनी कोरोनाची तिसरी लाट लवकरच येण्याची शक्यता वर्तवल्याने पालिका अलर्ट झाली आहे. यापूर्वी तौक्ते वादळाच्या दरम्यान बंद करण्यात आलेले बीकेसी, दहिसर, मुलुंड, भायखळा येथील कोविड सेंटर येत्या १२ ऑगस्टपासून टप्प्याटप्प्प्याने सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांना खाटांची कमतरता भासणार नाही.

कोविड सेंटरमध्ये २० हजार खाटा

मालाड, सायन चुनाभट्टी सोमय्या मेडिकल सेंटर आणि कांजुर मार्ग या ३ ठिकाणी प्रत्येकी २ हजार खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. सध्या बीकेसी, वरळी, गोरेगाव येथील नेस्को जम्बो कोविड सेंटर या ठिकाणी आवश्यकतेनुसार विस्तार करण्याची योजना आखण्यात आली आहे. या केंद्रात आवश्यकतेनुसार प्रत्येकी २ हजार याप्रमाणे ६ हजार अधिक खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे जम्बो कोविड सेंटर सुरू करताना ७० टक्के ऑक्सिजन बेड तर १० टक्के आयसीयू बेड उपलब्ध करण्यात येणार आहेत.