घरमुंबईमुंबईकरांचा मूड ऑफ; तिनही मार्गांवर मेगाब्लॉक!

मुंबईकरांचा मूड ऑफ; तिनही मार्गांवर मेगाब्लॉक!

Subscribe

मुंबईतील तिनही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आजचा रेल्वे प्रवास हा खूपच त्रासदायक ठरणार आहे.

मुंबईच्या तिनही मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला असून पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील दुरुस्तीची कामे देखील करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेवरील मुलुंड ते माटुंगा दरम्यान अप धिम्या मार्गवर सकाळी ११.१० ते ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉक दरम्यान अप धिम्या मार्गावरील वाहतूक अप जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. तर, हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी दरम्यान अप डाउन मार्गावर सकाळी ११.१० ते ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी – कुर्ला आणि वाशी – पनवेल दरम्यान स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजल्यापासून मेहाब्लॉक असला तरी पहाटे ६ वाजल्यापासूनच रेल्वेने आपल्या वेळापत्रकात बदल केले आहेत. मुंलुंड ते CSMT दरम्यान धावणाऱ्या गाड्यांच्या कांजुर मार्ग आणि विद्याविहार हे थांबे रद्द करण्यात आले आहेत. तशाप्रकारची घोषणा रेल्वेकडून सुरू आहे.

वीकएण्ड आणि पाऊस

शनिवारपासून मुंबईमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे फुल टू धम्माल करण्याच्या मुडमध्ये मुंबईकर असणार हे नक्की! पण, मेगाब्लॉकमुळे विकेण्ड धमाल करताना मुंबईकरांना थोडासा त्रास सहन करावा लागणार आहे. पण, त्यानंतर देखील पावसामुळे चौपाटी आणि बिचेसवर एन्जॉय करण्यासाठी मुंबईकरांची एकच गर्दी उसळलेली असेल!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -