घरमुंबईमुंबई-गोवा महामार्गावर मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल

मुंबई-गोवा महामार्गावर मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल

Subscribe

रामवाडी रेल्वे पुलाचे काम सुरू

मुंबई-गोवा महामार्गावर पेण-रामवाडी दरम्यान 2 तासाचा मेगा ब्लॉक घेण्यात आल्याने वाहतूक बुधवारी दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे पेण ते वडखळ तसेच तरणखोप गावापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. कोणतीही पूर्वसूचना न देता मुंबई-गोवा महामार्ग बंद केल्यामुळे प्रवासी वर्गाचे अतोनात झाले. भर दुपारी 40 डिग्री रणरणत्या तापलेल्या उन्हामध्ये अंगाची लाहीलाही होत होती. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत होत्या. रामवाडी रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला होता.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आठ वर्षांपासून संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. बर्‍याच ठिकाणी दोन्ही बाजूला रस्ता खोदलेला आहे. तर मोर्‍या व छोट्या पुलांची कामेही सुरु असून मातीचा भराव केला जात आहे. काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. विशेषतः अंतोरा फाटा, पेण रेल्वे स्थानक, उंबर्डे फाटा, मळेघर ते वडखळ बायपासपर्यंत उड्डाणपूल बांधले जात आहेत. परंतु हे काम करताना वाहतुकीचा विचार करण्यात आला नाही. त्यामुळे पेण रेल्वे स्थानक ते वडखळ या सहा किलोमीटरच्या अंतरात चार-चार तास रोज वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे सारेच जण बेजार झाले आहेत.

- Advertisement -

पेण जवळील रामवाडी रेल्वे लाईनवर गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे महामार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येऊन दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे पेण ते कांदळेपाडा तसेच पेण ते तरणखोप बायपासपासून गावापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. भर उन्हात हा मेगा ब्लॉक घेतल्यामुळे प्रवासी, विद्यार्थी तसेच नागरिकांचे फार हाल झाले. ही वाहतूक कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांना फार मेहनत घ्यावी लागली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -